Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

Dombivali News: गार्डीयन शाळेत भाजप महिला कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; धकाबुक्कीचा व्हिडियो व्हायरल

गार्डीयन शाळेत भाजप महिला कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; धकाबुक्कीचा व्हिडियो व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत देशमुख

डोंबिवली : शाळा प्रशासन स्थानिक विद्यार्थ्यांना एडमिशन देत नाही. तसेच उद्धट वागणूक देत असल्याचा आरोप करत भाजप महिला कार्यकर्त्यांनी आज (Dombivali) डोंबिवली भोपरमधील गार्डियन शाळेत गोंधळ घातला. या दरम्यान (BJP) भाजप महिला कार्यकर्त्यां व शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. भाजप महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला. (Breaking Marathi News)

डोंबिवली पूर्वेकडील भोपर परिसरात गार्डीयन ही शाळा आहे. आज दुपारच्या सुमारास शाळेत स्थानिक मुलांना प्रवेश दिला जात नाही. शाळा प्रशासन पालकांसोबत उद्धट वर्तन करत असल्याचा आरोप करत भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी शाळेत एकच गोंधळ घातला. यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयाबाहेर भाजप महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शाळेतील शिक्षक कर्मचारी व भाजप महिला कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की देखील केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे शाळेत तासभर गोंधळाची परिस्थिती होती.

शाळेकडून आरोप फेटाळले

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अखेर शाळा प्रशासनाशी बोलणं झाल्यानंतर या महिला तिकडून निघून गेल्या. तर याबाबत गार्डीयन शाळा प्रशासनाने भाजप कार्यकर्त्यांचा आरोप चुकीचा आहे. अशी कोणतीही चूक शाळेकडून घडली नाही आणि घडणार नाही. आजचा प्रकार गैरसमजुतीतून प्रकार घडलाय असे स्पष्टीकरण दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूर जिल्ह्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; रब्बी पिकांना मोठा फटका

Batata-Tomato Bharit Recipe : भाजी करायला वेळ नाही? १ बटाटा-टोमॅटो कापा अन् बनवा झणझणीत भरीत, टिफिन मिनिटांत फस्त होईल

कल्याण डोंबिवली महापालिकेचा कारभार वादात, कंत्राटदार कंपनीच्या हलगर्जीपणामुळे कर्मचारी गंभीर भाजला

MNS : मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह विधान, मनसे कार्यकर्त्यांनी तरुणाला अद्दल घडवली

Rajya Sabha: विनोद तावडे की धैर्यशील पाटील? राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ठरणार

SCROLL FOR NEXT