अभिजीत देशमुख
कल्याण : झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी ऑनलाईन रमी सर्कल खेळण्याचा नाद जडला. खेळताना पैसे हरला. त्यामुळे कर्जबाजारी झाला. कर्ज फेडण्यासाठी चक्क या तरुणाने एका वयोवृद्ध महिलेला लुटले. मात्र एका धाडसी तरुणाने या चोरट्याला पाठलाग करून पकडले. चोरटा नितीन ठाकरे (Dombivali) डोंबिवली विष्णूनगर पोलिसांच्या ताब्यात आहे. तर या चोरट्याला पकडणारा तरुण सर्वेश राऊत याचे सर्वत्र कौतुक (Crime News) होत आहे. मात्र या घटनेमुळे ऑनलाइनवरील या गेममुळे लोकं कोणत्या थराला जातायत याचे एक जिवंत उदाहरण समोर आलं आहे. (Latest Marathi News)
डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या ७० वर्षीय वयोवृद्ध महिला सुवर्णा नेवगी या काही खरेदी करण्यासाठी डोंबिवली पश्चिमेला गेल्या होत्या. खरेदी करून त्या डोंबिवली पश्चिमेतील गांधी उद्यान परिसरात असलेल्या रेल्वे पुलाच्या जीन्यातून जात होत्या. याच दरम्यान एक तरुण त्यांच्या जवळ आला. त्यांनी सुवर्णा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. हा सर्व प्रकार तेथून जाणाऱ्या सर्वेश राऊत या तरुणाने बघितला. सर्वेशने धाडस दाखवत त्या चोरट्याचा पाठलाग सुरू केला. अखेर काही अंतरावर त्याने चोरट्याला पकडलं.
याच दरम्यान त्या ठिकाणी विष्णूनगर पोलीस (Police) स्टेशनचे काही कर्मचारी आले. या चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नितीन ठाकरे मंगळसूत्र हिसकावून पडणाऱ्या तरुणाचे नाव आहे. नितीन हा खाजगी नोकरी करतो. रमी सर्कलवर गेम खेळण्याची सवय आहे. या खेळामुळे तो कर्जबाजारी झाला आहे. कर्ज झाल्याने पैसे कसे फेडणार या चिंतेत तो होता. यासाठी त्यांनी चोरीच्या मार्ग निवडल्याचे तपासात समोर आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.