Manpada Police Saam tv
महाराष्ट्र

Manpada Police : हाय प्रोफाईल इमारतीत सुरू होता धक्कादायक प्रकार; पोलिसांची छापा टाकत कारवाई, तिघेजण ताब्यात

Dombivali News : संभाजीनगरात चार- पाच दिवसांपूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दीड ते दोन किलो एमडी ड्रग्स आढळून आले आहे. पोलिसांनी अधिक तपास केला असता याचे मुंबई व गुजरात कनेक्शन असल्याचे समोर आले

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 

डोंबिवली : संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात आढळून आलेले दीड किलो एमडी ड्रग्स प्रकरणाचे मुंबई कनेक्शन समोर आले आहे. यानंतर डोंबिवलीमध्ये देखील दोन किलो एमडी ड्रग्स आढळून आले आहे. हाय प्रोफाईल इमारतीमध्ये मानपाडा पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

डोंबिवलीच्या खोणी पलावा परिसरातील हाय प्रोफाईल इमारतीवर छापा मारत मानपाडा पोलिसांनी कारवाई केली आहे. दरम्यान संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरात चार- पाच दिवसांपूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दीड ते दोन किलो एमडी ड्रग्स आढळून आले आहे. याचा पोलिसांनी अधिक तपास केला असता याचे मुंबई व गुजरात कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. यानंतर डोंबिवलीत इतक्या मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्स आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

२ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त 

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी डोंबिवलीच्या खोणी पलावा परिसरातील हाय प्रोफाईल इमारतीवर छापा टाकला. या ठिकाणी पोलिसांनी २ कोटी १२ लाख किंमतीचा जवळपास दोन किलो एमडी ड्रग्स जप्त केले आहे. तसेच ड्रग्स तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीमध्ये दोन पुरुष व एक २१ वर्षीय तरुणीचा समावेश असून तिन्ही आरोपी मुंब्राचे रहिवासी असून डोंबिवलीतील हाय प्रोफाईल इमारतीत फ्लॅट भाड्याने घेत एमडी ड्रग्सची तस्करी करत होते. 

ठाण्यासह परिसरात विक्री 

पोलिसांनी ताब्यात घेतलेले हे तिन्ही आरोपी एका कॉल सेंटरमध्ये काम करत असून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा करत ठाण्यासह आसपासच्या शहरात व शाळेच्या परिसरात विक्रीसाठी देत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणात अजून तीन आरोपी फरार असून पोलिसांची टीम फरार तिघांचा शोध घेत आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स एका हायप्रोफाईल सोसायटीत मिळाल्याने डोंबिवली एकदा पुन्हा चर्चेत आली आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 : मुंबईमध्ये विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणारे वाहन पलटी, १२ जण जखमी

Earthquake : अमरावतीमध्ये भूकंपाचे लागोपाठ २ धक्के, घरांतील भांडी पडली, नाल्याला भेगा

Nanded : गणरायाच्या विसर्जनासाठी उतरले नदीत; पाय घसरल्याने तिघेजण गेले वाहून, एकाला वाचवण्यात यश

Viral Video: बापरे...जीवघेणा स्टंट! तरुणाने चक्क पाण्यात जाऊन मासे नाही तर मगरीला पकडले, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT