Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: इंस्टाग्रामवर ओळख, भेटायचे ठरले; अन्‌ तो नवीन दुचाकी घेऊन पसार

इंस्टाग्रामवरील ओळख, भेटायचे ठरले; अन्‌ तो नवीन दुचाकी घेऊन पसार

प्रदीप भणगे

डोंबिवली : समाज माध्यमांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असतानाच डोंबिवलीत पुन्हा एकदा इंस्टाग्रामवरील ओळखीचा फायदा घेत नवी कोरी दुचाकी वाहन चोरल्याचे समोर आले आहे. दरम्यान (Dombivli) डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली असून त्याने आणखी चार ठिकाणी दुचाकी चोरी (Theft) केल्याचे समोर आले आहे. (Live Marathi News)

इन्स्टाग्रामवरून (Instagram) ओळख झाल्यानंतर आपण भेटूया असे अनिकेतने डोंबिवलीत राहणारे फिर्यादी करण सागवेकर यांना सांगितले. त्यांनतर ठाकुर्ली रेल्वे (Railway) स्टेशनजवळ भेटायचे ठरल्यानंतर करण आपली नवीन दुचाकी घेऊन अनिकेतला भेटायला आला. यावेळी तुझी नवीन गाडी चालवून बघतो असे सांगून अनिकेत रपेट मारायला गाडी घेऊन गेला तो परत आलाच नाही. बराच वेळ अनिकेतची वाट बघून थकलेल्या करणने अखेर पोलिस (Police) ठाण्यात धाव घेत आपली तक्रार नोंदवली.

दुचाकी चोरीमुळे वडीलांनी काढले घराबाहेर

दरम्यान सीसीटीव्हीचा आधार घेत पोलिसांनी अनिकेतला कल्याण परिसरातून सापळा रचून अटक केली. या आधी देखील अनिकेतने अशाच प्रकारे ठाणे शहरातील कोपरी आणि कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील दुचाकी चोरी केल्याने त्याच्या वडिलांनी त्याला घरातून हाकलून दिल्याचे त्याने तपासादरम्यान सांगितले. त्यामुळे आरोपी अनिकेत वाडकर हा फिरस्ता आहे. पुढील तपास पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, राम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक भराडे करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पंढरपूरमध्ये यंदा वारीत ‘एअर ॲम्बुलन्स’, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही : एकनाथ शिंदे

नीट पेपरफुटीनंतर निकालात घोळ, विद्यार्थी, पालकांचा संताप, NTAवर गंभीर आरोप

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! बड्या नेत्यानं केली नव्या पक्षाची घोषणा; थेट बारामतीतून फुंकले रणशिंग

कल्याण जेलमध्ये थरकाप! कैद्याला पोलिसांकडून बेदम मारहाण; पायाला 16 टाके

SCROLL FOR NEXT