Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

Dombivali News : खराब रस्त्यांमुळे महिलेचा मृत्यू; डोंबिवलीतील घटना, वयोवृद्धाचाही हात फ्रॅक्चर

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख
कल्याण
: रस्त्यांची दुरावस्था ही सगळीकडचीच समस्या झाली आहे. हीच परिस्थिती डोंबिवली शहरात देखील आहे. दरम्यान डोंबिवलीतील खराब रस्त्यांमुळे दोन गंभीर अपघात झाले असून, यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर एका वयोवृद्ध व्यक्तीचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून केडीएमसी अजून किती बळी घेणार? असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

डोंबिवलीतील (Dombivali) गरिबाचा पाडा परिसरात राहणारे सती प्रसाद कनोजिया व त्यांच्या पत्नी प्रमिला हे मुलासोबत ८ जुलैला दुचाकीवरून घरी येत होते. याच परिसरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांचा दुचाकीवरील तोल गेला आणि ते खाली पडले. दुर्दैवाने प्रमिला कनोजिया यांच्यावरून मागून येणारा ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेबाबत विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस तपास सुरू आहे. तर गरिबाचा पाडा परिसरातीलच दुसऱ्या घटनेत ६० वर्षीय बाळू नेहते या वयोवृद्ध व्यक्तीचा खड्ड्यांमुळे दुचाकीवरून तोल गेल्याने रस्त्यावर पडले. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे.

दोन्ही अपघात (Accident) एकाच परिसरात आणि एकाच ठिकाणी घडले आहेत. दरम्यान खराब रस्त्यांबाबत नागरिकांनी केडीएमसीकडे तक्रार दिली होती. तरी देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. केडीएमसीकडून नियोजनहीन पद्धतीने रस्त्यांची कामे सुरू आहेत. खड्डे बुजवले जात नाही, नित्कृष्ठ दर्जाची कामे सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नागरीकांनी महापालिकेकडून तात्काळ रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. अन्यथा आणखी अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur News : हत्येच्या चर्चेने गावभरात खळबळ; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं भलतंच सत्य

Marathi News Live Updates : कल्याण आणि ठाकुर्लीदरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत

Laxman Hake: लक्ष्मण हाके यांची हत्या करण्याचा कट; ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंचा आरोप

Village In India : ऐकावं ते नवलच.. 'या' गावात कोणाच्याच घरात चूल पेटत नाही

VIDEO : 'गोमूत्र प्याल तरच गरबा पंडालमध्ये या'; अजब मागणीची सगळीकडे चर्चा

SCROLL FOR NEXT