Dombivali Crime Saam tv
महाराष्ट्र

Dombivali Crime : एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात २१ लाखाची रोकड जळून खाक; डोंबिवलीतील घटना

Dombivali News : डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावर स्टेट बँक आफ इंडियाचे एटीएम आहे. १४ जानेवारीच्या मध्यरात्री चोरट्यांनी या एटीएममध्ये प्रवेश केला. त्यांच्याकडून एटीएम फुटत नसल्याने त्यांनी त्यांच्याजवळील गॅस कटरचा वापर सुरु केला.

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: डोंबिवलीतील महात्मा फुले रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये चोरीचा प्रयत्न झाला. (Dombivali) चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करत एटीएम कापुन रोकड चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. या दरम्यान एटीएममधील २१ लाखाची रोकड जळून खाक (Crime News) झाल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरी करण्यात आला आहे. (Tajya Batmya)

कल्याण- डोंबिवलीत घरफाेडी आणि चोरीच्या घटना सुरु आहे. काही दिवसापूर्वी ठाण्याचे (Police) पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या उपस्थित कल्याण डोंबिवलीतील नागरीकांना तीन कोटी ५५ लााख रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला आहे. हे सर्व सुरु असताना डाेंबिवली एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावर स्टेट बँक आफ इंडियाचे एटीएम (ATM) आहे. १४ जानेवारीच्या मध्यरात्री चोरट्यांनी या एटीएममध्ये प्रवेश केला. त्यांच्याकडून एटीएम फुटत नसल्याने त्यांनी त्यांच्याजवळील गॅस कटरचा वापर सुरु केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गॅस कटरने मशीन कट करीत असताना गॅससमुळे मशीनला आग लागली. या आगीत मशीनमधील २१ लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करुन पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. चोरट्यांनी चोरी करताना सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरुन नेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे चोरट्यांचा तपास लावन्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT