Dombivali Crime News Saam tv
महाराष्ट्र

Dombivli Crime News : जीवाच्या आकांताने तो पळत होता, रस्त्यामध्येच कोसळला; थरारक घटना CCTV मध्ये कैद

Dombivli Crime CCTV Video: जीवाच्‍या आकांतात तो धावत राहिला; भररस्‍त्‍यावरील थरारक घटना सीसीटीव्हीमध्‍ये कैद

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

डोंबिवली : किरकोळ कारणावरून मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पुर्व टाटा पावर परिसरात (Dombivili) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. शैलेश शीलवंत असे मयत तरुणाचे नाव असून याप्रकरणी आरोपी किरण शिंदे याला मानपाडा (Police) पोलिसांनी बेड्या ठोकल्या. (Latest Marathi News)

डोंबिवली पूर्वेकडे कल्याण शिर्डी टाटा पावर परिसरात शैलेश शीलवंत हा तरुण राहतो. शैलेश रिक्षा चालक असून त्याचे नाका कामगार असलेल्या किरण शिंदे यांच्याशी ओळख होती. शनिवारी रात्रीच्या सुमारास या दोघांमध्ये किरकोळ (Crime News) वाद झाला. या वादातून किरण शैलेशवर संतापला होता. याच वादातून किरणने शैलेशला टाटा पावर परिसरात एका इमारती शेजारी गाठले. शैलेशवर चाकूने हल्ला केला. यानंतर जीव वाचवण्यासाठी शैलेशने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. काही (CCTV) अंतर तो पळाला देखील मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने शैलेश जमिनीवर कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. डीसीपी सचिन गुंजाळ व एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे यांच्या पथकाने तपास सुरू केला. आजूबाजूला चौकशी केली असता कुणी काहीच माहिती देत नव्हते. अखेर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले सीसीटीव्हीमध्ये आरोपी किरण शिंदे शैलेशचा पाठलाग करत असताना दिसून आला. पोलिसांनी शिंदे यांची ओळख पटवून त्याला अवघ्या तासाभरात याच परिसरातून अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: शेवटचे ४८ तास! लाडक्या बहिणींनो आजच हे काम करा अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार

ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा, कोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर

Sindhudurg Tourism : कोकण किनाऱ्यावरील अभेद्य सागरी किल्ला; 'येथे' मराठ्यांनी घडवलाय पराक्रम

महाराष्ट्रावर आता टीबीचं मोठं संकट, ११ हजार गावं हाय रिस्कवर, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT