Dombivali Crime Saam tv
महाराष्ट्र

Dombivali Crime : धक्कादायक..अंगावर गाडी घालत तरुणाला नेले फरफटत; खासगी जागेत उभा राहिल्याने वाद

Rajesh Sonwane

अभिजित देशमुख 
डोंबिवली
: जागा माझी खासगी आहे, माझ्या खासगी जागेवर तुम्ही उभे का आहात? या कारणावरून जागा मालकाने तरुणाशी वाद घातला. इतकेच नाही तर संतापलेल्या कार चालकाने आपली कार या तरुणाच्या अंगावर घालत त्याला काही अंतरापर्यत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवली पूर्वेकडील दावडी परिसरात घडला. 

डोंबिवली (Dombivali) दावडी परिसरातील तुकाराम नगर येथे संजय यादव हा तरुण राहतो. संजय हा एमआरचे काम करतो. दरम्यान शनिवारी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास दावडी येथील शिव मंदीर परिसरात रस्त्याच्या बाजूला एका जागेवर उभे राहून त्याच्या मित्राशी बाेलत होता. याच वेळी त्याठिकाणी मिलिंद ठाकरे हा व्यक्ती त्याच्या जवळ आला. ज्या जागेवर तुम्ही उभे आहात. ती जागा माझी खासगी मालकीची आहे. त्या जागेवर उभे राहून का बोलत आहात. या कारणावरुन मिलिंद आणि संजय यांच्यात वाद झाला. त्यानंतर संजय घराकडे जाण्यासाठी निघाला. 

दरम्यान संजय हा रस्त्याने जात असताना मिलिंद ठाकरे याने कार घेऊन आले. त्यांनी संजयला मागून धडक देत त्याला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. जा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. घटनेत संजय यादव याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (Manpada Police) मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात मिलिंद ठाकरे याच्या विरोधात हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : १५ दिवसांत आचारसंहिता लागेल, कामाला लागा; अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना सूचना

Low Budget Kedarnath Trip : कमी पैशांत 'केदारनाथ यात्रा' कशी कराल? फॉलो करा हा प्लान

Nitin Gadkari : सत्ता कोणीचीही असो, रामदास आठवलेंना मंत्रिपदाची गॅरंटी; नितीन गडकरींच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला, VIDEO

Corona New Variant : युरोपमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा धुमाकूळ, भारताला किती धोका?

भारतीय अ संघाने जिंकली Duleep Trophy 2024! भारतीय क संघावर मिळवला 132 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT