Youth Leader Yogendra Bhoir Switches to Shiv Sena Saam
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का; रवींद्र चव्हाण यांच्या जवळच्या नेत्याने घेतली मशाल हाती

Youth Leader Yogendra Bhoir Switches to Shiv Sena: भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय योगेंद्र भोईर यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश. ऐन निवडणुकीत भाजपला मोठा धक्का.

Bhagyashree Kamble

  • डोंबिवली जिल्हा युवा मोर्चा सचिव योगेंद्र भोईर यांचा भाजपाला रामराम

  • शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

  • ऐन निवडणुकीत भाजपला मोठा धक्का

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पार पडतील. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात पक्षफोडीचं राजकारण सुरू आहे. सध्या भाजप पक्षात इनकमिंगचा धडाका सुरू आहे. अशातच डोंबिवलीत भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय योगेंद्र भोईर यांनी भाजप पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. भोईर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

ऐन निवडणुकीत भाजप पक्षाने इनकमिंगचा सपाटा लावला आहे. दरम्यान, डोंबिवलीत बड्या नेत्यानं भाजप पक्षाला रामराम ठोकला आहे. रोज शेकडो कार्यकर्त्यांना पक्षात दाखल करून घेणारे, स्वतःच्या गळाला कार्यकर्ते लावून घेणारे, रवींद्र चव्हाण यांना मोठा धक्का मानला जात आहे. रवींद्र चव्हाण यांचे राइट हँड समजले जाणारे योगेंद्र भोईर यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

योगेंद्र भोईर यांनी शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे. मातोश्रीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार, योगेंद्र भोईर यांच्यासोबत मोठ्या संख्येने भाजपातील अनेक पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

योगेंद्र पवार हे भाजप नेते रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जात आहे. डोंबिवलीत त्यांचं वर्चस्व आहे. डोंबिवली जिल्हा युवा मोर्चा सचिव म्हणून योगेंद्र भोईर कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून योगेंद्र भोईर हे भाजपची साथ सोडणार असल्याची चर्चा होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. भोईर यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart problems sudden deaths: अचानक होणाऱ्या मृत्यूंमागे प्रमुख कारण ठरतायत हृदयाच्या समस्या; तरूणांमध्ये प्रमाण वाढत असल्याचा ICMR चा दावा

Sweet Potato Bhaji: रताळ्याची भाजी बनवण्याची सोपी पद्धत, टिफीनसाठी ठरेल बेस्ट रेसिपी

शालेय पोषण आहारात १८०० कोटींचा घोटाळा, हिवाळी अधिवेशनात गंभीर आरोप

Shocking: १२ तासांत १००० हून अधिक पुरूषांसोबत लैंगिक संबंध, महिलेविरोधात मोठी कारवाई, थेट...

Ambernath : अंबरनाथकरांसाठी गुड न्यूज! पाणी टंचाईची झंझट संपणार, नालिंबी जलशुद्धीकरण प्रकल्प अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT