Coin Stuck In Throat तबरेज शेख
महाराष्ट्र

Nashik : घशात अडकलेले नाणे बाहेर काढले; १२ वर्षीय मुलीला डॉक्टरांनी दिले जीवनदान

Nashik News : ज्योतीला नाशिक जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन विभागात दाखल करुन एक्स-रे तपासणी करण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिक : खेळता-खेळता १२ वर्षीय मुलीने दहा रुपयांचे नाणे (Coin) गिळले. मात्र तिला वेळीच नाशिकच्या (Nashik) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर येथील कान, नाक आणि घसा तज्ज्ञांनी तत्काळ दुर्बिणीद्वारे शस्रक्रिया करुन तिच्या घशातील नाणे बाहेर काढले. ज्योती प्रकाश गवळी असे या मुलीचे नाव आहे. (Doctors Withdraw the coin stuck in the throat; Doctors give life to 12-year-old girl)

दोन दिवसांपूर्वी खेळतांना १० रुपयांचे नाणे तिच्या घश्यात अडकले होते. त्यामुळे तिला जेवतांना आणि श्वास घेताना त्रास जाणवू लागला. ज्योतीला नाशिक जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन विभागात दाखल करुन एक्स-रे तपासणी करण्यात आली. त्यानंतर पूर्ण भुल देऊन दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करून हे दहा रुपयांचे नाणे यशस्वीपणे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : "तुला माझ्यासोबत झोपावं लागेल..."; दिग्दर्शकाची प्रसिद्ध अभिनेत्रीकडे घाणेरडी मागणी

DA-DR Hike : सणासुदीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार डबल खूशखबर?; DA वाढीसह 'ही' घोषणा लवकरच, पाहा अपडेट

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये स्टेशन मास्तरांवरील हल्ल्यांविरोधात रेल्वे कर्मचारी असोसियन आक्रमक

Kolhapur ऊस दरवाढीवरून शेतकऱ्यांचा आक्रोश, २४ तासांपासून महामार्ग अडवला; वाहतूक खोळंबली, भाजीपाला ४० टक्क्यांनी महागला

Gold Rate : सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, १० तोळं सोनं ₹१०,३०० नी स्वस्त, तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT