Chhatrapati Sambhajinagar Crime News Saam TV
महाराष्ट्र

Sambhajinagar News : अवघ्या 4 महिन्यांपूर्वी लग्न, पतीचा चारित्र्यावर संशय; डॉक्टर पत्नीने संपवलं आयुष्य

Chhatrapati Sambhajinagar Crime News : पतीच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील बजरंग चौक परिसरात घडली.

Satish Daud

रामनाथ ढाकणे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

पतीच्या त्रासाला कंटाळून एका 26 वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील बजरंग चौक परिसरात शनिवारी (ता 24) घडली. प्रतीक्षा प्रीतम गवारे (वय 24) असं मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या 4 महिन्यांपूर्वीच प्रतीक्षाचा विवाह प्रीतम गरवारे या तरुणासोबत झाला होता. काही दिवसांच्या सुखी संसारानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले. चारित्र्यावर संशय घेऊन पती आपला मानसिक छळ करत असल्याची तक्रार प्रतीक्षाने तिच्या आई-वडिलांकडे केली होती.

तसेच माहेरून हुंड्याचे पैसे आणि फर्निचर साठी पैसे आणण्याचा पतीकडून तगादा लावला जात असल्याचा आरोप प्रतीक्षाने केला होता. दोघांमधील वादात कुटुंबियांनी मध्यस्थी देखील केली. मात्र, तरी देखील त्यांचे खटके उडतच होते.

दरम्यान, शनिवारी प्रतीक्षा आणि तिच्या पतीमध्ये पुन्हा वाद झाला. या वादानंतर तिचा पती बाहेर निघून गेला. यानंतर प्रतीक्षाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. महत्त्वाचं म्हणजे मृत्यूपूर्वी पतीला फोन करून घरी बोलावले. मात्र, तो येण्यापूर्वीच तिने गळफास घेतलेला होता. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : मोठी बातमी! मंत्री माणिकराव कोकाटेंना अटक होणार, वॉरंट निघाले

Latest Blouse Hand Designs: या 5 पॅटर्नमध्ये ब्लाऊजच्या हाताची डिझाईन शिवा, कोणतीही साडी नेसली तरी सुंदरच दिसेल

KDMC News : राज ठाकरेंना आणखी एक धक्का, शहराध्यक्षांचा मनसेला जय महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: परभणीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील दोन्ही गट स्वबळावर लढण्यासाठी ठाम

Hair Care: हजारो रुपयांच्या केराटिन ट्रीटमेंट्स कशाला? या ७ घरगुती कंडिशनरने केस बनवतील सिल्की आणि सॉफ्ट

SCROLL FOR NEXT