मावळ: एमआरआय मशीन विकण्याच्या बहाण्याने मुंबईतील कंपनीच्या संचालकांनी तळेगाव दाभाडे येथील एका डॉक्टरची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. श्रीहरी डांगे असे त्या डॉक्टरचे (Doctor) नाव असून त्यांनी कंपनीच्या संचालकाच्या विरोधात तळेगाव पोलिस (Talegaon Police) ठाण्यात फसवणुकीचा (Fraud) गुन्हा (Crime) दाखल केला आहे. (Doctor in Pune cheated out of crores of rupees in MRI machine purchase case)
हे देखील पहा -
मावळमधील (Maval) तळेगाव दाभाडे येथे डॉ. श्रीहरी डांगे हे हॉस्पिटल चालवतात. त्यांनी एमआरआय (Magnetic Resonance Imaging) मशीन (Machine) विकत घेण्याचे ठरविले, त्यानुसार त्यांनी अनेक ठिकाणी याबाबत चौकशी केली. त्यानंतर मुंबईमधील मॅक्सीस हेल्थकेअर इमेजिंग इंडिया या कंपनीला २०१४ साली संपर्क केला. त्यानुसार कंपनीकडून त्यांना मशीनची सर्व माहिती आणि कोटेशन देण्यात आले. त्यानुसार डांगे यांनी एमआरआय मशीन (MRI Machine) घेण्याचे ठरविले. तसा व्यवहारही झाला. मात्र काही महिन्यांनंतर संबंधित कंपनी कडून डॉ. डांगे यांच्याकडून आगाऊ रकमेची मागणी करण्यात आली. त्यानुसार डांगे यांनी दोन कोटी चार लाख रुपये आगाऊ रक्कम त्यांना दिली. मात्र अनेक दिवस उलटूनही त्यांना मशीन मिळत नव्हती. त्यांनतर कंपनीकडून उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली. डॉ. डांगे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान तत्कालीन तपास अधिकारी बाजीगरे यांनी कोणताही तपास न करता कोर्टाकडे क्लोजर रिपोर्ट सादर केला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याशी संपर्क साधत त्यांनी फेर तपास करण्याची मागणी केली. त्यानंतर आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पुन्हा तपास करून डॉ. श्रीहरी डांगे यांना न्याय दिला आहे. तर तळेगाव दाभाडे पोलिसांना एमआरआय मशीनच्या कोट्यावधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा फेरतपास करण्याचे आदेश दिले आहेत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.