Tarkarli Boat Accident news Updates, Pune News रोहिदास गाडगे
महाराष्ट्र

तारकर्लीच्या बोट दुर्घटनेत आळेफाटा येथील अस्थिरोगतज्ञांचा मृत्यू

आज मालवणमधील तारकर्लीच्या (Tarkarli) समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी भरलेली एक बोट बुडाल्याची दुर्घटना घडली होती.

रोहिदास गाडगे

पुणे : जुन्नर तालुक्यातील (Junnar Taluka) आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर स्वप्नील मारुती पिसे यांचा आज समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. आज मालवणमधील तारकर्लीच्या (Tarkarli) समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी भरलेली एक बोट बुडाल्याची दुर्घटना घडली होती त्यामध्ये डॉक्टर स्वप्नील मारुती पिसे देखील असल्याची माहिती समोर आली आहे. (Tarkarli Boat Accident news Updates)

आळेफाटा येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. स्वप्नील पिसे आपल्या कुटुंबियांसह मालवणमधील तारकर्ली येथे पर्यटनासाठी गेले होते. आज सकाळी तारकर्लीच्या समुद्र किनाऱ्यावरून २० जणांना घेऊन बोट स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती. त्यानंतरस्कुबा डायव्हिंग व्यवस्थित पार पडले. मात्र, तेथून परत येत असताना अपघात झाला.

हे देखील पाहा -

बोट समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर असतानाच सुसाट्याचा वारा आल्याने अचानक उलटली. बोट उलटल्यानंतर पर्यटकांना वाचावण्यासाठी मदतकार्य सुरु झाले. या सर्वांना समुद्रातून बाहेर काढेपर्यंत डॉ. स्वप्नील पिसे यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांवर मालवण ग्रामीण रुग्णालयात (Malvan Rural Hospital) उपचार सुरु आहेत. शांत, संयमी आणि कार्यतत्पर आणि मदतीसाठी कधीही धावून येणाऱ्या डॉक्टरांचा बुडून मृत्यू झाल्याने अनेक जण हळहळले आहेत.

कसा झाला अपघात ?

मालवण जवळील तारकर्लीत पुण्यासह मुंबई शहरातील २० जणांचा समुह पर्यटनासाठी आले होते. हे सगळे पर्यटक स्कुबा डायव्हिंगसाठी समुद्रात गेले. त्यांनी स्कुबा डायव्हिंग आटपून तारकर्ली समुद्र किनाऱ्याच्या दिशेने येत असताना अचानक सुसाट्याचा वारा आल्याने बोट उलटली आणि प्रवास करणारे २० पर्यटक सुमुद्राच्या पाण्यात कोसळले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT