डिग्री न घेता अनुभवातून मी सुद्धा 50% डॉक्टर झालोय - निलेश लंके विनोद जिरे
महाराष्ट्र

डिग्री न घेता अनुभवातून मी सुद्धा 50% डॉक्टर झालोय - निलेश लंके

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे आयोजित कोव्हिड योद्धा सन्मान सोहळ्यात बोलत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - कोरोनामध्ये Corona 80 टक्के मृत्यू हे भीती पोटी झालेले आहेत. लोकांची भीती घालवन्याच काम केलं,औषधापेक्षा रुग्णांची मानसिकता बदलवून 21 हजार रुग्ण कोरोनामुक्त केले. त्यामुळे डिग्री न घेता अनुभवातून मी सुद्धा 50% डॉक्टर Doctor झालो आहे. असं वक्तव्य आमदार निलेश लंके Nilesh Lanke यांनी केलं आहे. ते बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे आयोजित कोव्हिड योद्धा सन्मान सोहळ्यात बोलत होते.

या वेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले, सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री, पदमश्री शब्बीर सय्यद,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्यक्रमाचे अयोजक सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी यांची उपस्थिती होती.

हे देखील पहा -

पुढे बोलताना निलेश लंके म्हणाले, की कोरोनाच्या काळात ज्यांनी काम केलं त्यांच्या बाबतीत सरकार पॉझिटिव्ह विचार करत आहे. तिसऱ्या लाटेमध्ये देखील भीती न बाळगता काळजी घेतली पाहिजे. कोरोना काळात 80% रुग्णांचे मृत्यू केवळ भीतीपोटी झाले आहेत. औषधापेक्षा लोकांच्या मनातील भीती घालविणे हे प्रभावी औषध असल्याचे ओळखून रुग्णांमध्ये मिसळून त्यांची सेवा केली आणि त्यांच्या डोक्यातील कोविड काढण्याचे काम केले.

ज्या काळात रक्ताच्या नात्याचे लोक जवळ येत नव्हते. त्यावेळी लोकांना आधार देण्याचे काम कोविड सेंटरच्या माध्यमातून केले. 700 शुगर वय 68, ऑक्सिजन लेव्हल 60 असे रुग्ण ठणठणीत होऊन घरी गेले. तर "ऑक्सिजन लेव्हल 35 झाली तेव्हा, एका रुग्णाच्या पत्नी आणि मुलाला बोलवलं.

तर दोघांनी जवळ जायला नकार दिला, त्या रुग्णाला मानसिक आधाराची गरज असताना रक्ताची नाती जवळची निघून गेली. मात्र आम्ही त्या व्यक्तीला धीर देऊन जगवंल". काही रुग्ण मानसिक आधार नसल्याने आत्महत्येचा विचार देखील करायचे, त्यांना देखील धीर देऊन सावरलं अस निलेश लंके म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT