doctor advised cm eknath shinde to take rest saam tv
महाराष्ट्र

CM Eknath Shinde Health Update: मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली, डाॅक्टरांचा विश्रांतीचा सल्ला (पाहा व्हिडिओ)

महाराष्ट्र राज्य देशातील प्रगतशील राज्य बनवण्याचे यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याचे देसाईंनी नमूद केले.

ओंकार कदम

CM Eknath Shinde News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde latest news) आणि मी दोघे बरोबरच कार्यक्रमाला येणार होतो. काल दुपारपासून त्यांची तब्येत ठीक नाही. थोडा ताप आहे, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्यास सांगितले आहे अशी माहिती साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे दिली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कराडला येणार हाेते. परंतु अचानक त्यांचा दाैरा रद्द झाल्याने चर्चांना उधाण आले हाेते. (Maharashtra News)

देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण (yashwantrao chavan) यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (शनिवार) कराड येथील प्रीतिसंगम येथे राज्यातील अनेक नेते, कार्यकर्ते तसचे नागिरक यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत आहे. सकाळपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आदींनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने ते कराड येथे येऊ शकले नाहीत असे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी स्पष्ट केले. ते म्हणाले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्र राज्य देशातील प्रगतशील राज्य बनवण्याचे स्वप्न आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार पूर्ण करण्याचे प्रयत्न करीत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT