Jalgaon News Saam Tv News
महाराष्ट्र

Jalgaon Crime: 'पान टपरी शेजारी गाडी लावलीच का?' चालकाला तुडवलं, नंतर गाडीही फोडली

Jalgaon Crime News: पान टपरी शेजारी गाडी लावण्याच्या कारणावरून, पान टपरी आणि त्याच्या दोन भावांनी डीजे चालक मोतीलाल गुप्ता यांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे. या प्रकरणी जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

संजय जाधव, साम प्रतिनिधी

पान टपरी शेजारी गाडी लावण्याच्या कारणावरून, पान टपरी आणि त्याच्या दोन भावांनी डीजे चालक मोतीलाल गुप्ता यांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे. पान टपरीच्या शेजारी डीजेच्या दोन गाड्या लावल्याच कशा? असा प्रश्न विचारत त्यांनी चालकाला बेदम मारहाण केली आहे. हे धक्कादायक प्रकरण जळगाव जामोद परिसरात घडली असून, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

जळगाव जामोद शहरातील डॉक्टर आंबेडकर चौकात पान टपरी शेजारी गाडी लावल्यानं वाद निर्माण झाला. पान टपरी मालकानं गाडी चालकाला, पान टपरीच्या शेजारी डीजेच्या दोन गाड्या लावल्याच कशा? असा जाब विचारत, पान टपरी मालकानं आपल्या दोन भावांसह गाडी चालकाला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच डीजेच्या गाडीची देखील तोडफोड केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

स्थानिक आठवडी बाजार परिसरात मोतीलाल डीजे गाडी चालक सुंदरलाल गुप्ता राहतात. गुप्ता यांच्याकडे डीजेच्या दोन गाड्या आहेत. ते आपली वाहनं आंबेडकर चौकात रोडच्या बाजूला उभे करतात. याच ठिकाणी लखन म्हसाळ यांचे पान टपरीचे दुकान आहे. पान टपरीच्या शेजारी गुप्ता यांनी २ गाड्या लावल्यामुळे पान टपरी मालक संतापला.

पान टपरीच्या दुकानाला अडचण निर्माण होत असल्याच्या कारणावरून लखन म्हसाळ याने आपल्या दोन भावांना बोलावून घेतलं. नंतर मोतीलाल गुप्ता यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच त्यांच्या गाडीची देखील तोडफोड केली. या प्रकरणी मोतीलाल गुप्ता यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात जात लखन म्हसाळविरूद्ध तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : शक्तिवर्धक औषध घेणं जिवावर बेतलं ! धावता-धावता मानसिक संतुलन बिघडलं, पोलीस भरती दरम्यान घडला भयानक प्रकार

Maharashtra Live News Update : यो यो हनी सिंगच्या पुण्यातल्या कॉन्सर्ट वर पावसाच सावट

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

भाजप नेत्याच्या छळाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने संपवले जीवन; नागरिकांमध्ये संतापाची लाट

Shaktipeeth Expressway New Route: शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा; ९ गावांचा समावेश; कसा असणार मार्ग?

SCROLL FOR NEXT