Maharashtra Weather Update  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather: १३ जिल्ह्यात पावसाचा अंदाज, कोकणाला यलो अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

Weather Forecast News in Marathi : निम्म्या महाराष्ट्रात आज उघडीप असली तर पाडव्याला १३ जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Namdeo Kumbhar

Weather Update In Marathi : राज्यभरात सध्या दिवाळीचा उत्साह आहे. मागील दोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. आज दिवाळी पाडव्याला राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता (IMD Weather forecast) आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Weather at my location)

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, निम्म्या महाराष्ट्रात आज उघडीप असेल. तर १३ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह किरकोळ ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. शुक्रवारी सांगलीमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अवकाळी पावसाचा शेतक-यांना सर्वांधिक फटका बसला.

निम्म्या महाराष्ट्रात उघडीप -

आज, शनिवार दि.२ नोव्हेंबर(दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा) रोजी निम्म्या महाराष्ट्रात उघडीप असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग, नाशिक पुणे, कोल्हापूर घाटमाथा, सातारा बीड धाराशिव नांदेड लातूर परभणी अश्या १३ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित किरकोळ पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित २३ जिल्ह्यात आज स्वच्छ वातावरण जाणवेल.

लवकरच थंडीची चाहूल -

रात्री थंडी आणि दुपारी कडक ऊन, अशी परिस्थिती झाली आहे. महाराष्ट्रात सध्या दुपारचे कमाल तापमान सरासरी ३३ डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे तर पहाटेचे किमान तापमान २२ डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी अद्याप ऑक्टोबर हिटचा परिणाम दिसतोय. पण मंगळवारपासून संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू थंडीला सुरवात होईल,असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

मुंबईतील हवामानाची स्थिती काय आहे?

मुंबईसह उपनगरात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या फटक्यांमुळे मुंबईची हवा अधिक प्रदूषित झाल्याचे चित्र आहे. हवामानात बदल झाल्यामुळे मुंबईकर आजारी पडण्याची चिन्हे जास्त आहे. सर्दी, थंड, ताप अन् खोकला यासारखे आजार बळावण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT