दिव्यांग युवक-युवतींनी सुरु केला 'पर्यावरणस्नेही' राखी निर्मिती प्रकल्प!
दिव्यांग युवक-युवतींनी सुरु केला 'पर्यावरणस्नेही' राखी निर्मिती प्रकल्प! संजय तुमराम
महाराष्ट्र

दिव्यांग युवक-युवतींनी सुरु केला 'पर्यावरणस्नेही' राखी निर्मिती प्रकल्प!

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : काही दिवसावर येवून ठेपलेला रक्षाबंधनांचा सणRakshabandhan festival म्हणजेच सर्वांचा लाडका आणि भाऊ-बहिणींच्या नात्याला नव्याने आपुलकीची जाणीव करुण देणारा सण म्हणजेच राखीचा सण आणि तो साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात राख्यांची खरेदी केली जाते. मात्र काही राख्या या पर्यावरणासाठी अपायकारक असतात त्ययामध्ये इलेक्ट्रीकElectric, प्लँस्टीकPlastic राख्या अशा अनेक प्रकारच्या राख्या असतात त्या कतरा निर्माण करतात. याच पार्श्वभूमीवरती चंद्रपुरात दिव्यांग सहकार्य संस्थेने पर्यावरणस्नेही राखी निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. बांबूपासून राखी निर्मितीच्या या प्रकल्पाने दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर होण्याचा मार्गही दाखवला आहे..Divyang youths start 'eco-friendly' rakhi production project

हे देखील पहा-

चंद्रपूर जिल्ह्यातीलChandrapur District कोरोना परिस्थितीमुळेCorona period गेले दीड वर्षे अर्थकारण ठप्प होते. आता कोरोना रुग्णांची संख्या शून्याकडे वाटचाल करत असताना पुन्हा एकदा अर्थकारणाला गती येऊ लागली आहे. पुढ्यात येऊ घातलेला राखीचा सण असताना गेले दीड वर्षे घरातच बसून परिस्थिती सामान्य होण्याची वाट पाहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना पर्यावरणपूरक राखी निर्मितीने रोजगार व आर्थिक आधार दिला आहे.

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ भागात दिव्यांग सहकार्य संस्थेने गेले महिनाभर सुमारे 15 महिला-पुरुष दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या बांबू राखी निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आहे. बाबुपेठ भागात हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून, आकर्षक राखी निर्मिती करणारे हातही दिव्यांग तर राखी विक्री करण्यासाठीही दिव्यांगांचीच मदत घेतली जात आहे. दिव्यांग व्यक्तींना कोरोना काळानंतर भक्कम मदतीचा हात देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प उभा करण्यात आलाय. कच्चा माल व प्रत्यक्ष तयार राखी अशी मिळून महिनाभरात दिव्यांग बांधवांनी एक लाख रुपयांची उलाढाल केली आहे.

दिव्यांग बांधवांसाठी अशा पद्धतीने उभा करण्यात आलेला पर्यावरणपूरक eco-friendlyराखी निर्मितीचा प्रकल्प दिव्यांगांना नवनिर्मितीचे समाधान देत आहे. चंद्रपूर शहरातील चौकांमध्ये दिव्यांग सहकार्य संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचे स्टॉल उभारले आहेत. या स्टॉलच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती स्वतः निर्मिलेल्या राख्यांची विक्री करत आहेत. यामुळे या व्यवसायातील नफा देखील दिव्यांगांनाच मिळत आहे. पुढील वर्षी अधिक कौशल्यपूर्ण राखी निर्मिती करण्याचा संकल्प या दिव्यांग बांधवांनी केला आहे. चंद्रपूर शहरातील नागरिकांना बांबूच्या राख्या खरेदी करण्याचे आवाहनही संस्थेने नागरिकांना केले आहे.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

Special Report : "त्यांना बघून घेईन.." उद्धव ठाकरेंनी पोलिसांना खुला इशारा का दिला?

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

Today's Marathi News Live: पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT