अकोला महापालिकेच्या ऑनलाईन सभेत गोंधळ जयेश गावंडे
महाराष्ट्र

अकोला महापालिकेच्या ऑनलाईन सभेत गोंधळ; शिवसेनेचे आठ काँग्रेसचा एक नगरसेवक निलंबित!

महापौर अर्चना मसने यांनी शिवसेनेच्या आठ नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रहीम पेंटर यांना एका सभेसाठी निलंबित केले आहे.

जयेश गावंडे

अकोला : अकोला महानगरपालिकेच्या अंतर्गत आकारण्यात येणाऱ्या घर करावरील शास्ती रद्द करावी या मागणीसाठी शिवसेनेचे महापालिका गटनेते राजेश मिश्रा यांनी महानगरपालिकेमधून सुरु असणाऱ्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी येऊन आयुक्तांकडे व महापौरांकडे शास्ती रद्द करण्याची जोरादार मागणी केली.

हे देखील पहा -

यावर प्रभारी आयुक्त निमा अरोरा यांनी मागील सभेत या विषयावर निर्णय घेऊन ती एक महिन्यासाठी देण्यात आली होती. परंतु, आता त्यामध्ये वाढ करता येत नाही. त्यामुळे शास्ती रद्द करता येत नाही, असे राजेश मिश्रा यांच्यासह नगरसेवकांना सांगितले. त्यांच्या या विधानावर शिवसेनेच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ऑनलाईन सभेसाठी सुरु असलेली उपकरणे बंद केली.

मात्र, सभेत उपस्थित असलेल्या पोलिसांनी नगरसेवकांना सभेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी पोलिसांना विरोध केला. शेवटी, महापौर आणि आयुक्त यांनी सेनेच्या नगरसेवकांना शांत राहण्याची सूचना केली. मात्र, ते ऐकत नसल्याने चिडलेल्या महापौर अर्चना मसने यांनी शिवसेनेच्या आठ नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रहीम पेंटर यांना एका सभेसाठी निलंबित केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baaghi 4 vs The Bengal Files : टायगर श्रॉफ की पल्लवी जोशी वीकेंडला कोणी मारली बाजी? 'बागी ४'नं शनिवारी कमावले 'इतके' कोटी

Small Business Tips: Small Business सुरू करताय? 'या' महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि यशस्वी बनवा

Jalna Honour Crime : आधी गळा दाबून लेकीला संपवलं, नंतर बनाव रचला, पिक्चरपेक्षाही जालन्यात भयंकर घटना

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Ganpati Visarjan : गणपती विसर्जनाला गेलेले तीन तरुण बुडाले, एकाचा मृतदेह सापडला तर दोघे बेपत्ता

SCROLL FOR NEXT