Political tensions escalate in Solapur as BJP leaders allege a murder conspiracy after ZP election results Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: भाजपच्या नेत्याचा रक्तरंजित हत्येचा कट? राजकीय वर्तुळात भीतीचे सावट

BJP Leader Murder Conspiracy Allegation In Solapur: जिल्हा परिषद निकालानंतर भाजप नेत्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आलाय.. मात्र हा आरोप कुणी केला... हा भाजपचा नेता कोण? आणि हत्येचा आरोप कुणावर करण्यात आलाय.

Bharat Mohalkar

जिल्हा परिषदेचा निकाल लागला... सोलापूरमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली... मात्र आता निवडणूक रक्तरंजित कऱण्याच्या कटाबाबतच्या आरोपांच्या फैरी सुरु झाल्यात... माळशिरस तालुक्यात विरोधकांकडून भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करत पालकमंत्री जयकुमार गोरेंनी खळबळ उडवून दिलीय.. एवढंच नाही तर राम सातपुतेंच्या हत्येच्या कटाचा पोलीस तपासही सुरु झाल्याचं गोरेंनी सांगितलंय..

गोरेंच्या आरोपानंतर या वादात आणखी ट्विस्ट आलाय... भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंनी तर थेट पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीच आपल्या हत्येचा कट रचला, असा आरोप केलाय.... तर मोहिते पाटलांनी राम सातपुतेंचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं सांगत आरोप फेटाळून लावलेत...

दुसरीकडे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या म्हणण्यानुसार झेडपी निकालाच्या वेळी राम सातपुते यांनी पराभूत उमेदवार बाबा मानेंच्या तोंडावर गुलालाची गन मारली.. त्यामुळेच त्यांच्यात बाचाबाची झाली... मात्र हत्येच्या कटाचा आरोप जानकरांनी फेटाळून लावलाय..खरंतर महाराष्ट्राला राजकीय सुसंस्कृततेची परंपरा आहे... अनेकवेळा राजकीय मतभेद आणि वैयक्तिक संबंध वेगळे असल्याचं चित्र पाहायला मिळालंय.. मात्र नगरपालिका निवडणुकीपासून महाराष्ट्राच्या राजकारणाने बिहारच्या जंगलराजच्या दिशेनं वळण घेतलंय... कारण अनेक नेत्यांवर जीवघेणे हल्ले आणि हत्या झाल्याचं समोर आलंय..

अकोल्यात काँग्रेसच्या हिदायतुल्ला पटेल यांची राजकीय वादातून हत्या कऱण्यात आली.. तर रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये शिंदेसेनेच्या सुधाकर घारे यांचीही राजकीय हत्या कऱण्यात आली... शिंदेसेनेच्या हाजी अलीम कुरेशी यांच्यावरही अकोल्यातच वार करण्यात आले... मुंबईतील वांद्रे भागातही शिंदेसेनेच्या हाजी अकील यांच्यावर चाकूने वार कऱण्यात आले.. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या गाडीवर दगडफेक करत जीवघेणा हल्ला झाल्याचं समोर आलं...

आता प्रश्न पडतोय की, महाराष्ट्राची वाटचाल जंगलराजच्या दिशेनं होत असेल तर त्याला पायबंद घालण्याची गरज आहे... एवढंच नाही तर राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपातील सत्य शोधण्यासाठी पोलीसांनी ही तपास करुन दूध का दूध आणि पानी का पानी कऱण्याची गरज आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Hearing LIVE Updates :अपात्रतेचा निर्णय आधी, मगच पक्ष कोणाचा ते ठरेल, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे पुन्हा आक्रमक; जरांगेंना थेट माफी मागण्याचं आव्हान

मराठा समाजातील मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारेंची मिरवणूक, VIDEO

IPS अधिकाऱ्याच्या आईचा संशयास्पद मृत्यू; तोंडात कपडा कोंबला अन्..;

Fenugreek water: या 5 व्यक्तींनी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं मेथीच्या दाण्याचं पाणी; होतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT