Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

एकाच व्यक्तीला सहाव्यांदा पद दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी; हायकंमाडला पडलाय एक व्यक्ती,एक पदचा विसर

एकेकाळी यवतमाळ जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ - नुकताच उदयपूर येथे काँग्रेसने नव्या ऊर्जेसाठी नवसंकल्प शिबिरात चिंतन करून त्यात एकमताने एक व्यक्ती, एक पद, 'एक कुटुंब, एक तिकीट' असे संकल्प केले. मात्र यवतमाळ (Yavatmal) मध्ये एकाच व्यक्तींकडे आमदार, राज्यमंत्री दर्जाचं वक्फ बोर्ड अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, अध्यक्ष अभ्यासगत मंडळ, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ, सदस्य - अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी अभ्यासगट ह्या पदावर आधीच असताना आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार वजाहत मिर्झा यांची नियुक्ती केल्याने खुद्द काँग्रेस हायकंमाडलाच उदयपूर येथे केलेल्या नवसंकल्प चिंतन शिबिराचे विसर पडल्याने काँग्रेस नेत्यांमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे. यामुळे काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेल्याची काही नेत्यांची भावना आहे.

हे देखील पाहा -

एकेकाळी यवतमाळ जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. याच यवतमाळ जिल्ह्याने काँग्रेसला दोन मुख्यमंत्री दिले होते. आज काँग्रेस जिल्ह्यातून पुर्ण भुईसपाट झाल्याचे चित्र आहे. पुसद येथील वजाहत मिर्झा यांना जिल्हा काँग्रेस कमिटीचं अध्यक्ष पद देण्यात आलं. त्यानंतर एकापाठोपाठ पाच पद त्यांना देण्यात आली. काँग्रेसने उदयपूर येथे चिंतन शिबीरासाठी देशभरातील हजारो काँग्रेस नेत्यांना बोलवून त्या शिबिरात एक व्यक्ती,एक पद, एक कुटुंब, एक तिकीट असा संकल्प करित पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला.

मात्र काही तास उलटत नाही, तर पुन्हा काँग्रेस हायकंमाडने एकाच व्यक्तीला सहावा पद बहाल केल्याने चिंतन शिबिराचं काय झालं असा सव्वाल पक्षातील जेष्ठ नेते मंडळी विचारत आहे. वजाहत मिर्झा विरोधात बोलायला काँग्रेस मधिल नेते मंडळी समोर यायला तयार नाही, त्यामुळे त्यांची अवस्था नाक दाबून तोंडावर बुक्याचा मार खाण्याची वेळ आली आहे.

वजाहत मिर्झा हे विधान परिषदेचे आमदार असून त्यांच्या कडे जिल्हाध्यक्ष पद आहेत. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड अध्यक्ष(राज्यमंत्री दर्जा) अध्यक्ष अभ्यासगत मंडळ शासकीय वैधकीय महाविद्यालय यवतमाळ, सदस्य अल्पसंख्यांक हे सर्व पद असतांना आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्ष पद देण्यात आले आहे.

आधीच काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट आहेत. अशात काँग्रेसला जनतेशी तुटलेला संपर्क वाढविण्यासाठी नविन कार्यक्रम हाती घेणे गरजेचे असतांना होतकरू कार्यकर्त्यांना संधी न देता एकाच व्यक्तीला सहा पदावर बसविले जात असेल तर खरचं काँग्रेसला अच्छे दिन येतील का? या सारखे अनेक प्रश्न काँग्रेसच्या गोटातून उपस्थितीत केले जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : नवीकोरी स्कूटर महिन्यात खराब, पट्ट्याने शोरूमला नेली अन् पेटवून दिली, पुण्यातील घटना

Beed News: वाल्मिक कराडकडे सापडला स्पेशल फोन, भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ; बीड पोलिस संशयच्या भोवऱ्यात|VIDEO

Raigad : धक्कादायक! रायगडमध्ये उघड्या दरवाजाने एसटी धावली, व्हिडिओ व्हायरल

Gk : जगातील असे 7 देश जिथे कधीच होत नाही रात्र

Masala poha recipe: रोज कांदे पोहे खाऊन कंटाळात? मग नाश्त्याला ट्राय करा साऊथ इंडियन स्टाईल मसाला पोहे

SCROLL FOR NEXT