मुंबई: येत्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा कलगीतुरा रंगण्यापूर्वीच सत्ताधारी महाविकास आघडीमधील (Mahavikas Aghadi) तीन पक्षांमध्येच कलगीतुरा सुरू झाला आहे. या कलगितुरा सुरू होण्याचं मुख्य कारण आहे विधानसभा अध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असावा यावरून. काँग्रेसच्या (Congress) वाट्याला असलेलं विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्यात स्पर्धा आहे.
महाविकास आघाडीतील शिवसेनेनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची सूत्रांची माहीती आहे. मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला विरोध असल्याचं सूत्रांचं म्हणनं आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री पदावर असताना तेंव्हाच्या आघडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत त्यांचे नेहमीच खटके उडत होते.
खास करून स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील विसंवाद त्यावेळी चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांना विधान सभा अध्यक्ष करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) उत्सूक नसल्याची माहीती सूत्रांनी दिलीय.
दूसरीकडे संग्राम थोपटे विधान सभा अध्यक्ष झाले तर ते आक्रमक असलेल्या विरोधी पक्ष भाजपला किती नियंत्रणात ठेवू शकतील याबाबत शिवसेना संभ्रमात आहे. त्यामुळे विधान सभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देणं आता काँग्रेस पक्षाचा अंतर्गत प्रश्नं राहीलेला नाहीये. काँग्रेस जाहीर करणार्या उमेदवाराला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पसंती मिळनं आवश्यक आहे. आज होणार्या तीनही पक्षांच्या समन्वय समितीच्या नेत्यांना याच प्रश्नांवर तोडगा काढायचा आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.