Uddhav Thackeray and Nana Patole Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: नागपूर दक्षिणच्या जागेवरुन 'मविआ'त वाद पेटला! ठाकरे गटाचा दावा; काँग्रेसचा सामुहिक राजीनाम्याचा इशारा

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर:

Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मात्र जागा वाटपावरुन जोरदार कलह पाहायला मिळत आहे. एकीकडे जागा वाटपांच्या चर्चेवरुन ठाकरे गटाने नाना पटोलेंविरोधात भूमिका घेतली आहे तर दुसरीकडे नागपूरमध्येही जागा वाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये कलह पाहायला मिळत आहे.

नागपूर शहरातील दक्षिण नागपूरची जागा काँग्रेसला सोडली नाही, तर सामूहिक राजीनामा देण्याच्या इशारा दक्षिण नागपूर काँग्रेस पदाधिका-यांनी दिला आहे. दक्षिण नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी काल बैठक घेऊन ही जागा काँग्रेसला सोडावी अशी ठाम भूमिका घेतली आहे. 2019 ला काँग्रेसने ही जागा 4 हजार पेक्षा कमी मतांनी गमावली होती, आता काँग्रेसकडून अनेक इच्छुकांनी दक्षिण नागपूर करतात जोरदार तयारी केली आहे. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही या जागेवर आग्रह केल्यानं या जागेवरून पेच निर्माण झाला आहे.

दक्षिण नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी ही जागा काँग्रेसकरता सुटली नाही तर सामूहिक राजीनामा देऊ, सांगली पॅटर्नचा इशाराही दिला आहे. एकीकडे शिवसेना आणि काँग्रेसचा वाद सुरू असताना नागपुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ही आता पूर्व नागपूरची जागा मागत आहे. काँग्रेस दक्षिण आणि पूर्व नागपूरसाठी आग्रही असताना पूर्वची जागा आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मागितली जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटारा मिळावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी नागपुरात एक बैठक घेतलेली आहे. या बैठकीमध्ये सुद्धा पूर्व नागपूर मिळाल्यास पक्ष संघटन वाढीला मदत होईल, कार्यकर्ता नाही बळ मिळेल यासाठी जागेची मागणी होत आहे. नागपुरात पार पडलेल्या बैठकीमध्ये पदाधिकारी यांनी ही जागा राष्ट्रवादीला सुटत नसेल तर महाविकास आघाडीला मदत करण्याऐवजी राजीनामा शस्त्र उगारले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand BJP Candidate List : मोठी बातमी! झारखंड विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, कुणाला कुठून मिळाली संधी?

Nanded Politics : ऐन निवडणुकीत भाजपला मोठा धक्का; नांदेडमधील बड्या नेत्याने पक्षाला ठोकला रामराम, लवकरच तुतारी फुंकणार?

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची कोअर कमिटीची उद्या बैठक

Nanachi Tang: व्यंगचित्रकार अलोक यांनी मारलेली राजकीय कोपरखळी!

Ind vs NZ Test: 1996 नंतर भारतीय क्रिकेटमध्ये घडला इतिहास; सरफराज खानने केला कारनामा

SCROLL FOR NEXT