Disha Saam
महाराष्ट्र

Disha Salian: 'दिशा सालियानची हत्याच', शिंदे सेनेच्या नेत्याचा मोठा दावा; .. 'याच्यावर कसा विश्वास ठेवावा'? ठाकरे गटाच्या खासदाराकडून प्रत्युत्तर

Disha Salian parents demand justice: 'दिशा सालियानची प्रथम हत्या करण्यात आली होती. दिशा सालियानच्या वडिलांवर दबाव होता', मंत्री संजय शिरसाटांचा दावा.

Bhagyashree Kamble

दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची नव्यानं चौकशी करण्यात यावी अशी मागणी तिच्या पालकांनी केली. दिशाचे वडील सतीश सालियाननं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली, असा आरोप तिच्या वडिलांनी केला. या प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणात मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिशाची हत्या झाली आहे. या हत्येमागे अनेकांचा हात आहे, असा दावा शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.

दिशा सालियानच्या वडिलांवर दबाव होता

'दिशा सालियानची प्रथम हत्या करण्यात आली होती. दिशा सालियानच्या वडिलांवर दबाव होता. आता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र यामागे अनेकजण आहेत हे सिद्ध झालंय. आता याचा तपास पोलिस जलदगतीने करतील आणि जो कुणी आरोपी असेल त्याची थेट तुरूंगात रवानगी होईल', असं संजय शिरसाट म्हणालेत.

शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचं प्रयत्न

या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'दिशा सालियानच्या वडिलांचं ५ वर्षांनी म्हणणं आहे की, आमच्यावर दबाव होता. या गोष्टीवर कसा विश्वास ठेवावा. ठाकरे कुटुंबाला आणि शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे', असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात?

दिशा सालियानचा इमारतीच्या छतावरून पडून ८ जून २०२० साली मृत्यू झाला होता. दिशाच्या मृत्यूनंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. भाजप नेते नारायण आणि नितेश राणे यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. दिशाची हत्या झाली असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचाही हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

मुंबई पोलिसांनी २०२१ मध्ये दिशाच्या मृत्यूची चौकशी बंद केली होती. या प्रकरणात कोणतेही संशयास्पद पुरावे न आढळल्यामुळे त्यांनी चौकशी बंद केली होती. पण या प्रकरणी दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच चौकशीची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगेंची निर्णायक आंदोलनाची घोषणा, तारीखही सांगितली, फडणवीसांना काय दिला इशारा?

Diabetes : पावसाळ्यात थोडासा निष्काळजीपणा मधुमेहींसाठी घातक, 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास समस्या आणखी वाढेल

Cyber Crime : '1930' सायबर हेल्पलाइनच ठरली फसवणुकीचे हत्यार; खाती गोठवून लाखोंची खंडणी, आरोपी गजाआड

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा गावात अन्न औषध प्रशासन विभागाची धाड

Bombay High Court: 'समानतेचा अधिकार सोयीप्रमाणे वापरता येत नाही'; पोटगीवर मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!

SCROLL FOR NEXT