Chandrakant Patil: 7 मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट Saam TV
महाराष्ट्र

Chandrakant Patil: 7 मार्चनंतर दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा लवकरच होणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर: दिशा सालियन (Disha Salian murder death) प्रकरणाचा उलगडा लवकरच होणार आहे. त्या संबंधित सर्व पुरावे तयार असल्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील (Bjp Chandrakant Patil) यांनी कोल्हापुरामध्ये सांगितले आहे. या दरम्यान अभिनेता सुशांत सिंह हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी काल केले होते. तिने आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या (killing) करण्यात आली असल्याचे नारायण राणे यांनी म्हणाले आहेत. (disha salian case will be solved after march 7 all evidence ready said bjp chandrakant patil)

हे देखील पहा-

यावेळी तिथे कोणत्या मंत्र्यांची गाडी होती? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. राणेंनंतर आता भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. ७ मार्चनंतर दिसा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार आहे. त्या संबंधित सर्व पुरावे तयार असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आज केला आहे. दरम्यान दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होऊ नये याकरिता शिवराळ भाषा वापरणे सुरू असल्याचे यावेळी सांगितले आहे.

सुशांतच्या घरात सावंत नावाचा मुलगा कुठे गेला? तो अद्याप बेपत्ता आहे. तसेच रॉय म्हणायचा मुलगा होता, तो कुठे गेला, तो देखील अद्याप गायब असल्याचे राणे यावेळी सांगितले आहे. तसेच दिशा सालियनच्या घरातील वॉचमन कुठे आहे? तो देखील गायब असल्याचे राणेनी यावेळी म्हणाले आहेत. कोण काहीतरी लपवत आहे, हेच यावरुन स्पष्ट होत असल्याचे राणेंनी यावेळी सांगितले आहे. लपवलेल्या गोष्टी बाहेर यावे असेही राणे कालच्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान म्हणाले होते.

सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला वांद्रा येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. ज्याचा तपास मुंबई पोलीस करत आहे. सुशांतच्या मृत्यूच्या एक आठवड्या अगोदर म्हणजेच ८ जून दिवशी सुशांत सिंहची पूर्व मॅनेजर दिशा सालीयनने मालवण येथील एका इमारतीमधून उडी मारुन आत्महत्या केली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anil Gote : भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय; माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर हल्लाबोल

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

SCROLL FOR NEXT