Satara News : साताऱ्यात दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या विविध मागण्या मान्य होत नाहीत म्हणून पालकमंत्री शंभूराज देसाई (satara guradian minister shambhuraj desai) यांच्या निवास्थाना बाहेर आंदोलन केले. यावेळी दिव्यांगांनी प्रशासनाच्या विराेधात घाेषणा देत परिसर दणाणून साेडला. (Maharashtra News)
दिव्यांगांसाठी स्वच्छ्ता गृहाची सुविधा उपलब्ध करावी, शासकीय कार्यालयांत दिव्यांग व्यक्तींना कामासाठी ताटकळत ठेवू नये तसेच इतर मागण्यांसाठी शहर व परिसरातील दिव्यांग व्यक्ती आक्रमक झाले हाेते. त्यांना आज चक्क मंत्री देसाई यांच्या काेयना दाैलत या निवासस्थानासमाेर आंदाेलन छेडले.
काही दिव्यांग व्यक्तींनी तर त्यांचे शर्ट काढून आंदाेलनास प्रारंभ केला. या आंदाेलनामुळे पाेवई नाका परिसरातील वाहतुक खाेळंबली. अचानक दिव्यांगांचे आंदाेलन झाल्याने पाेलिसांची देखील तारांबळ उडाली. यावेळी मंत्री देसाई यांच्या निवासस्थानासमाेर पाेलिसांची फाैज बाेलावली लागली. घटनास्थळी वरिष्ठ पाेलिस अधिका-यांसह महिला पाेलिस कर्मचारी दाखल झाले.
यावेळी पाेलिसांनी दिव्यांग आंदाेलकांना रस्त्यावर बसू नये असे आवाहन केले. परंतु आंदाेलकांनी मागण्या मान्य हाेईपर्यंत उठणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे पाेलिसांची पंचायईत झाली.
अखेरीस पाेलिसांनी बळाचा वापर करुन आंदाेलकांना प्रशासनास निवेदन द्यावे असे सांगत रस्ता माेकळा केला. दरम्यान या आंदाेलनानंतर दिव्यांगांनी आगामी काळात आजच्या पेक्षा माेठं आंदाेलन छेडणार असल्याचा इशारा माध्यमांच्या माध्यमातून प्रशासनास दिला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.