Dinkar Patil during his BJP party induction amid controversy over repeated political defections Saam Tv
महाराष्ट्र

भाजपात उपऱ्यांना उपरणे, निष्ठावतांची उपेक्षा, दलबदलू दिनकर पाटलांना निष्ठेसाठी रडू

Dinkar Patil Return To BJP Sparks Debate: उपऱ्यांना पक्षप्रवेशाचं उपरणं देऊन निष्ठावतांची उपेक्षा करण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षात सुरु आहे..अशातच नाशिकमधील दिनकर पाटलांच्या भाजप पक्षप्रवेशानं दलबदलू राजकीय नेत्यांच्या निष्ठेवरच सवाल उपस्थित होताय.. पण पाटलांनी निष्ठेवर नेमकं काय म्हटलं?

Snehil Shivaji

राजकारणात अनेकांनी निष्ठेच्या नावावर प्रतिष्ठा मिळवत आपल्या कष्टानं अनेक पक्ष मोठे केले पण अनेक पक्ष बदलून निष्ठेचं सोंग घेणारे दलबदलू सोंगाडे देखील जन्माला आले. त्यातच महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर आणि निष्ठांतराला सुरुवात झाली. यात आघाडी घेतलीय ती नाशकातील दिनकर पाटलांनी. दिनकर पाटलांच्या या दलबदलू इतिहासावर जर एक नजर टाकली तर राज्यशास्त्रात त्यांच्यावर एक धडा अभ्यासक्रमात ठेवायला हरकत नसावी. ऐका पाटलांनी बदललेल्या पक्षांची क्रमवारी खुद्द त्यांच्याच तोंडून

दिनकर पाटील

पक्ष किती बदलले

वर्ष पक्ष

1989 - 95 जनता दल

1996 - 2013 कॉंग्रेस

2014 - 2014 बसपा

2014 - 2024 भाजप

2024 - 2025 महाराष्ट्र नवनिर्माण सेना

2025 - ? भाजप

ऐकलंत, पक्ष - निष्ठा - विचारधारा निवडणुकीसाठी कशी बदलली गेली. बरं हे विरोधकांनी सांगितलेलं नाही तर खुद्द दिनकर पाटलांनीच आपल्या पक्षांतरांच्या इतिहासाबद्दल सांगितलंय. आता त्यांनी ज्या पक्षात प्रवेश केला त्या भाजप बद्दल त्यांच्या मनात काय प्रतिमा होती हे तुम्हाला जाणून घ्यायंच असेल तर मग ऐका भाजपबद्दलच काय म्हणतायेत पाटील

लबाडांचा पक्ष भाजप असं दिनकर पाटील म्हणतायेत. पण खरंच भाजप लबाडांचा पक्ष आहे की दिनकर पाटिल लबाड बोलत होते. कारण आता आम्ही जी 2 दृष्य तुम्हाला दाखवणार आहोत ते पाहून तुम्हीच ठरवा ..

ठाकरे बंधुची युती झाल्यानंतर 24 डिसेंबरला आनंदानं नाचणारे हे तेच दिनकर पाटिल आणि अवघ्या 24 तासाच्या आतच विकासाचं स्वप्न उराशी बाळगत थेट भाजपमध्ये प्रवेश करते झाले

एकीकडे निष्ठावंत ओक्साबोक्शी रडत असतांना सत्तापिपासू मात्र प्रत्येक निवडणूकीत नवनवे पक्ष घेऊन लोकांना निष्ठेचे धडे देतायेत. राजकारणात पक्षांतर हे नित्याचंच पण दिनकर पाटलांच्या पक्षांतराची कहाणीला दलबदलू शब्द ही कमी पडेल. लोकसभेला बसपा, विधानसभेला मनसे आणि महापालिकेला भाजप असे धडाधड पक्ष बदलणारे आणि हुकमी रडू येणाऱ्या दिनकर पाटील यांच्यासारख्या संधीसाधू नेत्यांना आता मतदारांनीच त्यांची योग्य जागा दाखवून दिली पाहिजें .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मुंबई महापालिकेतील महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, शिंदेसेना ९० जागा तर भाजपला १३७ जागा

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

SCROLL FOR NEXT