dilip patil- mujbal 
महाराष्ट्र

एसपींच्या आवाहनानंतरही महा आक्रोश मोर्चावर गाेर सेना ठाम

युवकाच्या खूनानंतर काळी दौलत येथे घटनेच्या १५ दिवसा नंतरही पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

यवतमाळ (yavatmal) : पुसद (pusad) ग्रामीण पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या काळी दौलत येथे श्याम राठोड या युवकाचा शुल्लक कारणावरून तलवारीने निर्घृण खून करण्यात आला. त्याचे पडसाद परिसरात दगडफेक, जाळपोळीच्या प्रकाराने उमटले. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी पाच जिल्ह्यातील एक हजार पेक्षा जास्त कर्मचारी घटनास्थळी तैनात केले. अद्यापही काळी दौलतमध्ये पोलिसांचा (police) बंदोबस्त लावण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ गोर सेनेच्या वतीने उद्या (शुक्रवार, ता. १७) पुसद येथे महा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत नुकतीच चर्चा करून महा आक्रोश मोर्चा काढून नये असे आवाहन केले आहे. गोरसेना मात्र मोर्चा काढण्यावर ठाम राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागु करण्यात आला आहे. या महा आक्रोश मोर्चात कोणीही सहभागी होऊ नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील-मुजबल यांनी केले आहे.

गोर सेना ही बंजारा समाजची संघटना आहे. युवकाच्या खूनानंतर काळी दौलत येथे घटनेच्या १५ दिवसा नंतरही पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे. उद्या माेर्चा निघणार की पाेलिसांच्या आवाहनास प्रतिसाद मिळणार हे पहावे लागणार आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गृहमंत्र्यांना कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही – अतुल लोंढे यांची टीका|VIDEO

Gen Z सोशल मीडियावर सर्वाधिक काय पाहतात?

लेक प्रेमात पडली, बाप हैवान झाला! मुलीचा झोपेतच गळा आवळला, नंतर जे केलं ते वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

Kacchya kelyachi Bhaji Recipe: झटपट बनवा कच्च्या केळ्याची खमंग भाजी!

Aishwarya Rai: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायची उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT