Former Congress MLA Dilip Mane to Take BJP’s Lotus Saam
महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; बड्या नेत्याची भाजपच्या दिशेनं वाटचाल, राजकारण तापलं

Former Congress MLA Dilip Mane to Take BJP’s Lotus: काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने भाजप पक्षात लवकरच प्रवेश करणार. कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार.

Bhagyashree Kamble

  • सोलापुरातील राजकारण तापलं.

  • काँग्रेसचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर.

  • दिवाळीनंतर पक्षप्रवेश पार पडणार.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे. राज्यातील प्रत्येक पक्ष आपली घडी मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. प्रत्येक तालुक्यांमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशातच सोलापुरातही राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी भाजपचं कमळ हाती घेणार असल्याचं निश्चित केलं आहे. या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

अलिकडेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप माने, यशवंत माने, राजन पाटील आणि बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजीत आणि विक्रम शिंदे आदींनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दिलीप माने यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याची चर्चा सुरू झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने सोलापुरात ऑपरेशन लोटस सुरू केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी गुरूवारी मुख्यमंत्र्यांची निवासस्थानी भेट घेतली. माजी आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा रंगली होती. दिलीप माने यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं.

हा पक्षप्रवेश सोहळा दिवाळीनंतर भाजप कार्यलयात पार पडणार आहे. प्रवेशनंतर सोलापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडेल, अशी माहिती समोर आली आहे. कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन दिलीप माने काँग्रेसला जय महाराष्ट्र करणार असल्याचं सांगितलं. दिवाळीनंतर दिलीप माने भाजपचं कमळ हाती घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने यांनी काँग्रेसची साथ सोडल्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

३० हजार पगार, २० हजार भाडं; मोठी शहरं.. मध्यमवर्गीयांनी जगावं तरी कसं? विश्लेषकाची पोस्ट व्हायरल

Sangram Jagtap: हिंदूंच्या दुकानात 'लादेन आणि सद्दाम'चे फटाके कसे? अजित पवारांच्या आमदाराचा सवाल|VIDEO

Rohit Sharma Fitness: रोहित शर्माने कसं कमी केलं १० किलो वजन? तब्बल 252 तास हिटमॅनने घेतली इतकी मेहनत

Tharala Tar Mag: 'ज्योती ताईंच्या आठवणी जाग्या...'; पूर्णा आजीच्या एन्ट्रीवर जुई गडकरी झाली भावूक, म्हणाली- 'रोहिणी ताई सेटवर...'

Maharashtra Live News Update : महाराष्ट्राच्या यादीत ९६ लाख बोगस मतदार - संजय राऊत

SCROLL FOR NEXT