Dilip Mane Saam TV
महाराष्ट्र

Dilip Mane : माजी आमदार दिलीप माने यांची आज काँग्रेसमध्ये होणार घरवापसी

Solapur Constituency : आज दुपारी एक वाजता मुंबईतल्या टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळालीये. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने काँग्रेसमध्ये परतत

विश्वभुषण लिमये

Dilip Mane Join Congress :

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघांचे माजी आमदार दिलीप माने हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.

आज दुपारी एक वाजता मुंबईतल्या टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळालीये. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने काँग्रेसमध्ये परतत असल्याने काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेना यांना याचा फायदा होणार असल्याची शक्यता आहे.

दिलीप माने हे जवळपास 25 वर्ष काँग्रेसमध्येच होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभव झाल्यानंतर ते राजकारणात कुठल्याही पक्षात सक्रिय नव्हते.

काँग्रेसचे निष्ठावंत आमदार म्हणून दिलीप माने यांची या आधी ओळख होती. मात्र 2019 साली दिलीप माने यांनी शिवसेनेकडून प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने काँग्रेसमध्ये पुन्हा परतत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WCL मध्ये नोकरी लावून देतो, अकोल्यात २५ जणांना कोट्यवधींना गंडवलं, शिंदेंच्या माजी आमदाराच्या नावाने धमक्या

Maharashtra Live News Update : पवना धरणात 76 टक्के पाणीसाठा

Success Story: २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोवर्स; IPS सचिन अतुलकर आहेत तरी कोण?

Sun Ketu nakshatra transit: 100 वर्षांनी सूर्य केतू एकाच दिवशी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना होणार अचानक धनलाभ

Viral Video : मैदानात मुलांसोबत फुटबॉल खेळणारी गाय; व्हिडिओ पाहून डोक्याला हात लावाल

SCROLL FOR NEXT