Devendra Fadnavis On Dikshabhumi  Saam Tv
महाराष्ट्र

Dikshabhumi: दीक्षाभूमीतल्या अंडरग्राऊंड पार्किंगच्या कामाला स्थगिती; वाद पेटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Devendra Fadnavis On Dikshabhumi Parking Construction : वास्तू संदर्भात वेगवेगळी मते असणे योग्य नाही. एकमत झाल्यावर काम करू असं देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं.

Bharat Jadhav

नागपूरमध्ये दीक्षाभूमीतील अंडरग्राऊंड पार्किंगला नागरिकांनी विरोध केला. संतप्त आंदोलकांनी बांधकामाचं साहित्य पेटवून दिलं. या आंदोलनाचे पडसाद विधीमंडळात उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बांधकामाला स्थगिती देण्याची घोषणा केलीय.

एक आराखडा तयार केला होता. २०० कोटी त्यासाठी दिले आहेत. दीक्षाभूमीने हा आराखडा मान्य केलेला आहे. आज अंडरग्राउंड पार्किंग करू नये, म्हणून आंदोलन सुरू आहे. परंतु संपूर्ण आराखडा हा स्मारक समितीने मंजूर केलेला आहे. त्याला राज्य सरकारला फक्त निधी दिलाय. परंतु सध्या लोकभावना लक्षात घेता या कामाला स्थगिती देण्यात येत असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढील निर्णय दीक्षाभूमी समिती व लोकांसोबत बसून बैठक घेऊन घेतला जाईल. या बैठकीत योग्य चर्चा करून निर्णय घेतला जाणार. अशा वास्तू संदर्भात वेगवेगळी मते असणे योग्य नाही. एकमत झाल्यावर काम करू. स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे सरकारने निधी दिला आणि काम सुरू झाले. आता चर्चेनंतर पुन्हा निर्णय घेऊ, त्यानंतर काम सुरू केले जाईल, असं फडणवीस विधानसभेत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Puja Samagri List: गणपती पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची संपूर्ण लिस्ट तुम्हाला माहिती आहे का?

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा पनवेल बाजार समितीला फटका; ग्राहकांनी फिरवली पाठ

४ मुली, १ मुलगा अन् गेस्ट हाऊसमधला तो रूम...पोलिसांची अचानक धाड पडताच उडाली खळबळ; आक्षेपार्ह साहित्य जप्त

Cloves-Garlic Benefits : रोज खा लवंग-लसूण; हृदयासह मेंदूही राहील तंदुरुस्त, ७ जबरदस्त फायदे वाचाच

8th Pay Commission: पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर! 8व्या वेतन आयोगात होणार हे 6 मोठे बदल

SCROLL FOR NEXT