Ganpati Puja Samagri List: गणपती पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची संपूर्ण लिस्ट तुम्हाला माहिती आहे का?

Manasvi Choudhary

गणरायाचे आगमन

अवघ्या काही तांसामध्ये लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन होणार आहे अशावेळी तुम्ही गणपती बाप्पाच्या स्वागताची आणि पूजेची तयारी करणे महत्वाचे आहे.

Ganpati Puja Samagri List | google

गणपती पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची संपूर्ण लिस्ट

गणरायाच्या आगमनानंतर पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठा आणि उत्तरपूजेसाठी लागणारे सर्व साहित्य अगोदर आणणे महत्वाचे आहे यासाठी गणपती पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांची संपूर्ण लिस्ट या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Ganpati Puja Samagri List

बाप्पाच्या स्थापनेसाठी लागणारे साहित्य

गणरायाच्या स्थापनेसाठी गणपतीची मूर्ती , चौरंग, लाल वस्त्र, रांगोळी, झेंडू- शेवंतीची फुले, दुर्वा, विड्याची पाने, सुपारी, खारीक, बदाम आणि नाणे इत्यादी साहित्य तयार ठेवा.

Ganpati Puja Samagri List

पूजेची मुख्य भांडी

गणरायाच्या पूजेसाठी तांब्याची किंवा पितळेची ताम्हण, पळी, आचमणी, कलश, समई, दिवे, पंचामृतासाठी आणि हळद- कुंकूचे भांडे ही भांडी तयार ठेवा.

Ganpati Puja Samagri List

पूजेसाठी लागणारे आवश्यक साहित्य

गणरायाच्या पूजेसाठी वाती, निरंजन, कापूर, अगरबत्ती किंवा धूप हे साहित्य तयार ठेवा.

Ganpati Puja Samagri List

अभिषेक आणि पूजेचे साहित्य

अभिषेक आणि पूजेच्या साहित्यासाठी हळद- कुंकू, अष्टगंध , अक्षता, जानवे जोडी, सुती वस्त्र किंवा उपरणे अत्तर किंवा सुवासिक तेल तयार ठेवा. अभिषेक करण्यासाठी शुद्ध पाणी, दूध, दही, तूप, मध तयार ठेवा.

Ganpati Puja Samagri List

फळे

लाडक्या गणरायाला पाच फळे अर्पण करतात यासाठी तुम्ही केळी, नारळ , सफरचंद, संत्री, डाळिंब ही पाच फळे तयार ठेवा.

Ganpati Puja Samagri List

नैवेद्य

गणपती बाप्पाला २१ मोदकाचे नैवेद्य दाखवा. याशिवाय पंचामृत करण्यासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखरेचे मिश्रण तयार ठेवा.

Ganpati Puja Samagri List

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

NEXT: Ganpati Festival Rangoli Designs: गणपती स्वागतासाठी सोप्या आणि सुंदर 5 रांगोळ्या, ज्या पटकन होतील

Ganpati Festival Rangoli Designs
येथे क्लिक करा...