Manasvi Choudhary
लाडक्या गणरायाच्या आगमनाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी दारात सुंदर रांगोळी काढणे अत्यंत शुभ मानले जाते.
तुम्हालाही दारासमोर सुंदर रांगोळी काढायची असेल तर आम्ही तुम्हाला 5 सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स सांगणार आहोत त्या तुम्ही पाहून घ्या.
बाप्पाच्या स्वागतासाठी दारापासून मखरापर्यंत गणपतीच्या लहान पावलांची रांगोळी तुम्ही काढू शखता.
बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक! मोदकाच्या आकाराची छोटी रांगोळी तुम्ही दारासमोर काढा.
फुलांची रांगोळी दाराची शोभा वाढवते. तुम्हालाही झटपट कमी वेळेत रांगोळी काढायची असेल तर तुम्ही ओरिजनल झेंडूच्या फुलांचा वापर करून सुंदर फुलांची रांगोळी काढा.
भारतीय संस्कृतीत कलश हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तांदूळ, हळद-कुंकूनी सजवलेले कलश तुम्ही काढा.
गणरायाला मोराचे पीस प्रिय आहे. तुम्ही मोराचे पीस रांगोळीत काढू शकता.