Manasvi Choudhary
स्वयंपाक करताना योग्य तेलाची निवड करणे आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी आणि हृदयासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. बाजारात अनेक प्रकारची तेले उपलब्ध आहेत त्यापैकी शेंगदाणा तेल फार पूर्वीपासून वापरले जात आहे, तर अनेकजण ऑलिव्ह ऑईल देखील वापरतात.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी स्वयंपाकात कोणते तेल वापरावे, हा प्रश्न अनेकांना पडतो. शेंगदाणा तेल आणि ऑलिव्ह ऑईल दोन्हीपैकी कोणते तेल आरोग्यासाठी फायदेशीर आहे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या
शेंगदाणा तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स योग्य प्रमाणात असतात, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि पचनासासही हलके म्हणून तुम्ही शेंगदाणा तेलाचा वापर करू शकता.
ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि ‘ओमेगा-३’ फॅटी ऍसिड असतात, जे जळजळ कमी करण्यास मदत करतात.
ऑलिव्ह ऑईल कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.