Diesel Tanker Saam Tv News
महाराष्ट्र

Ahilyanagar News: नगर पुणे महामार्गावर टँकर उलटला, डिझेल भरण्यासाठी नागरीकांची झुंबड

Ahilyanagar Pune highway news: अहिल्यानगर पुणे महामार्गावर चास गावाजवळ डिझेल टँकर उलटला आहे. टँकर उलटल्यानंतर महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती.

Bhagyashree Kamble

अहिल्यानगर पुणे महामार्गाच्या चास गावाजवळ डिझेल टँकर उलटला आहे. चास गावाजवळील धोकादायक वळणाचा अंदाज चालकाला आला नाही. धोकादायक वळणाचा अंदाज चालकाला न आल्यानं भरधाव वेगाने येणारा डिझेल टँकर उलटला आहे. टँकर उलटल्यानंतर हजारो लिटर डिझेल रस्त्यावर सांडले. ज्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

अहिल्यानगर पुणे महामार्गाच्या चास गावाजवळ डिझेल टँकर उलटल्यानं डिझेलचं मोठं नुकसान झालं आहे. चास गावाजवळील धोकादायक वळणाचा अंदाज न आल्यानं चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे डिझेलने भरलेला टँकर उलटला आहे. टँकर उलटल्यानंतर नागरिकांची डिझेल घेण्यासाठी झुंबड उडाली होती.

डिझेल टँकर उलटल्यानंतर नगर पुणे रोडवर दोन किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांग पाहायला मिळाले. नगर पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानंतर नागरीक त्रस्त झाले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली.

अग्निशामक दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर, डिझेल टँकरवर साबण मिश्रीत फॉगचं पाणी फवारण्यात आलं. तसेच नगर तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. टँकर उलटल्यानंतर चालकाला दुखापत झाली आहे का? नेमका टँकर उलटला कसा? याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT