History Behind Alibaug Name Saam Tv
महाराष्ट्र

Alibaug Name History: अलिबागला 'अलिबाग' नाव कसं पडलं माहितीये का?

History Behind Alibaug Name: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अलिबाग शहराचे नाव बदलण्याची मागणी केलीय. पण या शहराचे नाव अलिबाग असं कशावरून पडलं माहितीये. काय आहे या शहराचा इतिहास याची माहिती आपण जाणून घेऊ.

Bharat Jadhav

Why Alibaug Named As Alibaug:

भाजप सरकारच्या काळात शहरांचे नाव बदलाची मोठी मोहीम उद्यास आलीय. अनेक राज्यातील शहरांची नावे बदलण्यात आली. सध्या लोकसभा निवडणुकीचा काळ सुरूये. राजकीय पक्षांची प्रचार यात्रा सुरू झालीय. प्रचाराच्या सुरुवातीलाच शहरांच्या नामांतराचा मुद्दा समोर आलाय. उत्तर प्रदेशसह राज्यातील अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबादचे नावे बदलण्यात आल्यानंतर आता परत आणखी एका शहराचं नाव बदलण्याची मागणी होत आहे.

हे शहर आहे, अलीबाग. अलिबागचं (Alibaug) नाव बदलण्यात यावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलीय. नाव बदलण्याची मागणी कारण्यात आली हे आपण जाणून घेऊ. नामांतराचं कारण जाणून घेण्याआधी अलिबागला अलिबाग हे नाव कसं पडलं यांची माहिती तुम्हाला आहे का? नाही ना मग हा लेख वाचा...

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वीकेंड घालवायचा असेल तर मुंबईकरांच्या डोक्यात पहिलं ठिकाण येतं ते म्हणजे अलिबाग. या छोट्या मराठी बेटावर उष्णकटिबंधीय हवामान असतं, जे संपूर्ण वर्षभर पर्यटकांना आपल्याकडे खेचत असतं. अलिबाग हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात वसलेले ३०० वर्षे जुने किनारपट्टीचे सुंदर शहर. निसर्गरम्य समुद्रकिनारे, हिरवेगार निसर्गसौंदर्य हे अलिबागच्या पर्यटनाचं खास वैशिष्ट्ये.

विशेष म्हणजे गर्भश्रीमंतांचे बंगलेही अलिबागच्या किनारीच वसलेले आहेत. त्यात अनेक सेलिब्रिटि लोकांचा यात समावेश होतो. अलिबागमध्ये रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, वरसोली, थळ, नवगाव, किहीम आणि आवास या गावांचा समावेश होतो. त्यांना एकत्रितपणे ‘अष्टागार’ (आठ गावे) म्हणून ओळखलं जातं. येथे हिंदू, मुस्लिम, पोर्तुगीज- ख्रिश्चन, बेने इस्रायल ज्यू आणि पारशी यांसारखे अनेक समुदायाचे लोक राहतात. बेने इस्रायल ज्यू समुदायातील अली नावाच्या व्यक्तीने तीन शतकांपूर्वी या शहराला आपले नाव दिलं.

अलिबागचा इतिहास

अलिबागने मराठा राजवटीत अनेक लढाया पाहिल्या होत्या. १७०६ मध्ये वरसोली येथे कान्होजी आंग्रे आणि जंजिऱ्याचे सिद्दी यांच्यात मोठं युद्ध झाले. १७२२ मध्ये, इंग्रज आणि पोर्तुगीज सैन्याने संयुक्तपणे कोलाबा किल्ल्यावर हल्ला केला, परंतु मराठा सैन्याने त्यांचा पराभव केला. १७३० मध्ये इंग्रजी नौदलाने पुन्हा हल्ला केला होता.

कान्होजी यांचे शौर्य आणि उत्तम नौसैनिक कौशल्याने त्यांना सर्व शत्रूंविरुद्ध अपराजित ठेवले होतं. त्यांचे धैर्य आणि शौर्य पाहून शिवाजी महाराज यांनी अलिबाग आणि इतर अनेक भाग कान्होजी आंग्रे यांना भेट म्हणून दिले. आंग्रे हे छत्रपती शिवाजी महाराजाच्या साम्राज्याचे सक्षम नौदल प्रमुख होते.

१७ व्या शतकाच्या अखेरीस कान्होजी यांनी अलिबागचा विकास केला. त्या काळात सध्याचे अलिबागला लागून असलेले रामनाथ हे गाव कामाचे मुख्य केंद्र होते. सोळाव्या शतकापूर्वी अलिबागचा बहुतांश भाग पाण्याखाली होता, असं म्हटलं जातं. कान्होजी यांनी हे शहर वसवले आणि प्रसिद्ध कुलाबा किल्ल्यावरून त्याचे नाव कुलाबा ठेवले.

या बंदर क्षेत्राला आंतरराष्ट्रीय नौदल व्यापार आणि व्यापाराचे मुख्य केंद्र बनवण्याचे स्वप्न कान्होजींचे होते. अलिबाग शहराच्या विकासासह, कान्होजी आंग्रे यांनी "अलिबागी रुपैया" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदीच्या नाण्यांच्या रूपात स्वतःचे चलन जारी केले. होते.

अलिबाग हे नाव कसं पडलं

अलिबागच्या नावाला ऐतिहासिक संदर्भ असून ‘अली’ हे एका व्यक्तीचे नाव आहे. तर बाग म्हणजे बगीचा, म्हणजेच याचा अर्थ ‘अलीची बाग’ असा होतो. ३०० वर्षांपूर्वी या भागात अली नावाचा एक व्यक्ती राहत होता. या श्रीमंत बेने इस्रायली व्यक्तीच्या नावावरून या शहराचे नाव 'अलिबाग' पडले आहे. त्याने या भागात अनेक विहिरी खोदल्या आणि बागा उभ्या केल्या. जुन्या कुलाबा गॅझेटियर मध्ये ‘अलीबाग, म्हणजे अलीची बाग. एका श्रीमंत मुस्लीम व्यक्तीच्या नावावरून या शहराचे नाव पडले. या संदर्भ कुलाबा जिल्हा गॅझेटियर आढळतो. हे गॅझेटियर १८८३ साली प्रकाशित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT