Dial 112 Face Call News Saam TV
महाराष्ट्र

Dial 112 Gondia: आपत्कालीन क्रमांकावर तब्बल ११० वेळा खोटे कॉल्स; महिलेला ६ महिन्यांची शिक्षा

Dial 112 Face Call News: एका अज्ञात महिलेकडून ११२ या क्रमांकावर तब्बल ११० वेळा कॉल करत खोटी माहिती दिली आहे.

अभिजीत घोरमारे

गोंदिया: आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी भारत सरकारची डायल ११२ ही सेवा देशभर दिली जाते. या सेवेमुळे अडचणीत असलेल्या अनेकांना दररोज मदत होते, त्यामुळे ही सेवा महत्वाची मानली जाते. मात्र, काही टवाळखोर ११२ या आपत्कालीन क्रमांकावर (Emergency Response Support System in India - 112) फोन करुन खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करतात, यामुळे पोलिसांचा वेळ, श्रम आणि पैसा वाया जातो. गोंदिया (Gondia) जिल्ह्यातही अशीच घटना घडली आहे. एका अज्ञात महिलेकडून ११२ या क्रमांकावर तब्बल ११० वेळा कॉल करत खोटी (Fake Call) माहिती दिली आहे. त्यामुळे या महिलेवर कारवाई होऊन तिला तब्बल ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (dial 112 fake call news)

हे देखील पाहा -

गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील एका महीलेने ९ दिवसांत तब्बल ११० वेळा डायल ११२ वर कॉल करुन खोटी माहीती दिली, जे तिला चांगलेच महागात पडले आहे. या महिलेला आता सहा महिन्यांसाठी कारावासात जावे लागले आहे. हे महाराष्ट्रातील पहीलेच प्रकरण असल्याचं बोललं जात आहे.

एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन पोलिसांच्या डायल ११२ या क्रमांकावर वारंवार कॉल येत होते. एका लहान मुलाची हत्या झाली आहे. त्वरीत पोलिस मदत पाठवा, अशी माहिती दिली जात होती. नंतर तो मोबाईल बंद करण्यात येत होता. त्या महीलेने ९ दिवसात तब्बल ११० वेळा डायल ११२ वर कॉल करुन खोटी दिली.

दरम्यान पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत चौकशी केली आणि ती महिला पोलीसांना खोटी माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान अवघ्या दहा दिवसात हे प्रकरण न्यायालयासमोर आले असता, अर्जुनी मोरगाव प्रथम सत्र न्यायालयाने त्या खोटारड्या महिलेला पाचशे रुपये दंड आणि सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असून डायल ११२ वर कॉल करुन खोटी माहिती देणे त्या महिलेला चांगलेच भोवले आहे.

याबाबत अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनमाथ कदम हे सामटिव्हीशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र पोलिसांनी कुणावर अन्याय, अत्याचार, चोरी, मारहाण आणि गुन्हेगारीवर त्वरीत आळा बसावा यासाठी डायल ११२ प्रणाली सुरू केली आहे. मात्र, त्याही प्रणालीचा दुरुपयोग करुन त्या महिलेने तब्बल ११० वेळा कॉल करीत खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल करीत त्यांना शारीरीक आणि मानसिक त्रास दिला. डायल ११२ ही प्रणाली नागरीकांच्या सोयीसाठी केलेली असताना त्याचा दुरुपयोग अशा तऱ्हेने करणे अत्यंत दुर्दैवी आहे असं ते म्हणाले. तसेच राज्यातील नागरीकांनी डायल ११२ या प्रणालीचा सदुपयोग करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT