Zila Parishad School Student Protest Saam TV
महाराष्ट्र

Dhule Teacher Transfer: आवडत्या शिक्षकासाठी विद्यार्थ्यांनी शाळा पाडली बंद

Zila Parishad School Student: आवडत्या शिक्षकाची बदली थांबवण्यात यावी, यासाठी शिरसोली जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा बंद पाडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Zila Parishad School Student Protest:

बऱ्याच वेळा शिक्षकांच्या नकारात्मक बाजुच्या बातम्या आपण वाचत असतो. विद्यार्थ्यांना कडक शिक्षा केल्यामुळे शिक्षकांवर आपण राग व्यक्त करत असतो. परंतु अशी काही शिक्षक आहेत. ज्यांच्यावर शाळेतील विद्यार्थी जिवापाड प्रेम करत असतात. प्रिय शिक्षकांची बदलली झाली तर विद्यार्थी भावनिक होत रडू लागतात.

धुळे जिल्ह्यातील शिरसोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाची बदली झाल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांनी आंदोलन करत चक्क शाळा बंद पाडलीय. कुंदन असं बदली झालेल्या शिक्षकाचं नाव आहे. शिरसोली जिल्हा परिषदेच्या आवडत्या शिक्षकांची बदली करण्यात आल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळेबाहेर आंदोलन केले.

जोपर्यंत आमच्या शिक्षकांची बदली रद्द करीत नाहीत, तोपर्यंत शाळेमध्ये येणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली. विद्यार्थ्यांच्या मागणीला त्यांच्या पालकांनीदेखील पाठिंबा देत शिक्षकांची बदली रद्द करण्याची मागणी केली. जोपर्यंत शिक्षकांची बदली रद्द होत नाही, तोपर्यंत पाल्यांना शाळेत पाठवणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांच्या पालकांनी घेतली.

आपल्या आवडत्या शिक्षकांची बदली रोखण्यासाठी चिमुकल्यांनी केलेल्या या आंदोलनाचे सध्या साक्री तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरामधून कौतुक केले जातंय. आता धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभाग या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेणार का? हे बघणं औचित्याच ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

‘या’ ब्लड ग्रुपच्या व्यक्तींना असतो Brain Stroke चा अधिक धोका

Shilpa Shetty: 'परी म्हणू की सुंदरा...' शिल्पा शेट्टीचा स्टायलिश अंदाज

Sindhudurg : विवाहितेची आत्महत्या, पतीसह माजी नगराध्यक्षाच्या विरोधात तक्रार; ठाकरे गटाचे नेते पोलीस स्टेशनवर धडकले

Jasprit Bumrah: लॉर्ड्सच्या मैदानावर जसप्रीत बुमराहचा 'पंचबळी'; ऑनर बोर्डवर कोरलं जाणार नाव!

Maharashtra Live News Update : बदनामी थांबवा! पडळकर एफ सी रोड वर या

SCROLL FOR NEXT