Dhule ST Bus Accident Saam TV marathi
महाराष्ट्र

ST Bus Accident : भीषण अपघात! एसटी बस अन् ट्रकची जोरदार धडक; ४५ विद्यार्थी जखमी, ६ जण गंभीर

Dhule ST bus truck accident latest news : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात म्हसदीजवळ एसटी बस आणि ट्रकची भीषण धडक झाली. अपघातात ४५ विद्यार्थी जखमी असून ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.

Namdeo Kumbhar

भूषण अहिरे, धुळे प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Dhule ST Bus Accident : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील म्हसदी गावाजवळ एसटी बस आणि ट्रक यांचा भीषण अपघाताची घटना घडली. धुळे ते म्हसदी मार्गावरून धावणाऱ्या एका बसला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात शाळेत आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या ४० ते ४५ विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.

शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश; ६ जण गंभीर

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये शाळा आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. ट्रकची धडक इतकी भीषण होती की बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्दैवी घटनेत ४० ते ४५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ ते ६ विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते.

शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

अपघातानंतर जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमी विद्यार्थ्यांवर वैद्यकीय पथकाकडून तातडीने उपचार सुरू आहेत. अपघाताची बातमी पसरताच पालकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली असून परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

स्थानिकांमुळे वाचला अनेकांचा जीव

एसटी बस आणि ट्रकची धडक झाल्यानंतर म्हसदी गावाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बसमधील जखमी विद्यार्थ्यांना तातडीने स्थानिकांनी बाहेर काढले. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली अन् जखमींना रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकऱणी गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे. धुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. जखमी विद्यार्थ्यांवर सध्या जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ६ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

Pune water cut : पुणेकरांना मोठा धक्का! आजपासून दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; महापालिकेचा निर्णय

Maharashtra Weather : राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान, 'या' दिवशी कोसळणार मुसळधार; हवामान खात्याचा मोठा इशारा

Cancer : भूक कमी झालेय? जठराच्या कॅन्सरचा असू शकतो धोका, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Thusday Horoscope : आज ग्रहांची मोठी उलथापालथ होणार! या ६ राशींचे नशीब फळफळणार; गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT