Dhule Ganeshotsav  Saam tv
महाराष्ट्र

Dhule Ganeshotsav : धुळ्यात गणेशोत्सवाला गालबोट; विसर्जन मिरवणुकीत ३ बालकांचा चिरडून मृत्यू, परिसरात शोककळा

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यामध्ये गणपती विसर्जनाला गालबोट लागले आहेत. मिरवणुकीदरम्यान ट्रॅक्टरखाली आल्यामुले तीन बालकांचा जागीच मृत्यू झालाय. या दुर्दैवी घटनेत सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलेय. गणपती मिरवणुकी दरम्यान ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

लाडक्या गणरायाला राज्यात भक्तीमय वातावरणात निरोप दिला जात आहे. ढोल-ताशाच्या गजरात आणि डिजेच्या तालावर धुंद होत गणपती बाप्पााला निरोप दिला जात आहे. पुढच्या वर्षी लवकर , असे म्हणत जड अंतकरनाने लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला जातोय. पण याच उत्सवाला धुळ्यात गालबोट लागले आहेत.

गणपती मिरवणुकीवेळी मोठी दुर्घटना घडली आहे. धुळे तालुक्यातील चितोड येथे गणपती मिरवणुकीच्या दरम्यान ट्रॅक्टरखाली आल्याने तीन बालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आणखी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल करण्यात आले आहे.

मिरवणुकीच्या दिवशी दुर्घटना

गणरायाला निरोप देताना धुळ्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्या जवळच्या चित्तोड गावात एकलव्य मित्र मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे.

दारुच्या नशेत होता चालक

गाण्याच्या तालावर मिरवणुकीत सर्व कार्यकर्ते नाचत होते. मद्यधुंद असलेल्या दुसऱ्या चालकाने ट्रॅक्टर अचानक सुरू केला. त्या ट्रॅक्टरखाली आल्याने तीन लहान बालकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे धुळ्यात खळबळ उडाली आहे. ट्रॅक्टर चालक हा मद्यधुंदीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. धुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT