Shirpur Police Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Police : लसणाच्या आडून अफूची अवैधपणे वाहतूक; ट्रकसह दोघे ताब्यात, शिरपूर तालुका पोलिसांची कारवाई

Dhule News : मध्य प्रदेश येथील शेंदवाकडून शिरपूरकडे अफूची अवैधपणे ट्रकमधून वाहतूक केली जात असल्याची खात्रीलायक माहिती गुप्त माहितीदाराकडून शिरपूर तालुका पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती.

भूषण अहिरे

धुळे : बंदी असताना अफूची वाहतूक केली जात आहे. हा प्रकार उघड होऊ नये यासाठी ट्रकमध्ये लसूणच्या (Dhule) गोण्या भरून त्यात अफूची फुले भरून वाहतूक केली जात होती. शिरपूर तालुका पोलिसांनी (Police) अफूची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक व वाहकासह लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. (Latest Marathi News)

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) येथील शेंदवाकडून शिरपूरकडे अफूची अवैधपणे ट्रकमधून वाहतूक केली जात असल्याची खात्रीलायक माहिती गुप्त माहितीदाराकडून (Shirpur) शिरपूर तालुका पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे (Shirpur Police) शिरपूर तालुका पोलिसांनी शिरपूर जवळील पळासनेर येथील चेक पोस्टजवळ सापळा रचला. या सापळा दरम्यान पोलिसांना माहिती मिळालेला ट्रक आढळून आला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१० लाखाची अफूची फुले  
पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेत वाहन चालक व वाहकास या संदर्भात विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिली. त्यानंतर पोलिसांनी सदरचा ट्रक पोलीस ठाण्यात आणून त्याची संपूर्ण तपासणी केली. त्यामध्ये लसणाच्या आडून अफूची बोंडे वाहून नेली जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. जवळपास ५२ किलो अफूची बोंडे पोलिसांनी हस्तगत केले असून त्यांची बाजारामध्ये दहा लाखांहून अधिकची किंमत मानली जात आहे. या दरम्यान पोलिसांनी जवळपास २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aishwarya Narkar: निळ्या साडीतील ऐश्वर्याचं सौंदर्य पाहून म्हणाल स्वप्नसुंदरी...

Sangli Politics: मुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा, सदाभाऊ खोतांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Nashik MNS : नाशिकमध्ये मनसेला आणखी एक धक्का; माजी जिल्हाध्यक्षांचा भाजप उमेदवाराला पाठिंबा

Nora Fatehi: चुराके दिल मेरा गोरिया चली, नोराचं सुंदर सौंदर्य

Cyber Crime : इंटरनेटवर संपर्क क्रमांक शोधणे पडले महागात; दहा लाखात ऑनलाईन फसवणूक

SCROLL FOR NEXT