Shirpur Accident Saam tv
महाराष्ट्र

Shirpur Accident : भरधाव डंपरची रिक्षाला धडक; दोन महिलांचा मृत्यू, सहा जखमी

Dhule Shirpur News : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ताजपुरी (ता. शिरपूर) फाट्याजवळ हा अपघात घडला. शिरपूर तालुक्यातील गिधाडे येथून प्रवासी घेऊन रिक्षा शिरपूरकडे मार्गस्थ झाली

Rajesh Sonwane

शिरपूर (धुळे) : प्रवाशी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. तर सहा प्रवासी जखमी झाले. अपघातातील जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून, त्यांना धुळे येथे रवाना करण्यात आले.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Agra Highway) ताजपुरी (ता. शिरपूर) फाट्याजवळ हा अपघात घडला. शिरपूर तालुक्यातील गिधाडे येथून प्रवासी घेऊन रिक्षा शिरपूरकडे मार्गस्थ झाली. ताजपुरी फाट्याकडून महामार्गावर येत असलेल्या डंपरने रिक्षाला जोराची धडक दिली. त्यामुळे रिक्षा पुढे फेकली गेली. रिक्षाला धडक (Accident) बसल्याने प्रवाशी घाबरले होते. अपघात पाहून महामार्गावरून जाणाऱ्यांनी थांबत मदतकार्य सुरू केले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचारांना सुरुवात झाली.

दरम्यान या अपघातात दगूबाई राजू ठाकरे (वय ५३, रा. मरीमातानगर, अमळनेर) व कमलबाई मगन मराठे (५८, रा. क्रांतीनगर, शिरपूर) यांचा मृत्यू झाला. अन्य सहा प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यातील चौघांना धुळ्याला हलविण्यात आले आहे. घटनेनंतर पोलीस दाखल झाले होते. या अपघात प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक

कोणत्या भाज्यांमध्ये टॉमेटोची प्युरी घालू नये, बेचव होईल भाजी

Sleeveless top fashion tips: तुमच्यासाठी कोणता टॉप परफेक्ट? स्लिव्हलेस की फुल स्लीव्ह्ज...ही एक सोपी ट्रिक करेल तुमची मदत

Mumbai : ठाकरे बंधूंचा महापालिकेत करेक्ट कार्यक्रम होणार, भाजपने सोडला टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT