Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Shindkheda Crime : ओढणीने गळा आवळून मुलीची हत्या; संशयातून मेहुण्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

Dhule News : शिंदखेडा पोलिस ठाण्यात ६ फेब्रुवारीला मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान ११ फेब्रुवारीला विरदेल शिवरातील दादरीच्या शेतात गोणपाटात मुलीचा मृतदेह आढळून आला होता.

साम टिव्ही ब्युरो

धुळे : विरदेल (ता. शिंदखेडा) शिवारातील शेतात १५ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा मृतदेह गोणपाटात (Dhule) आढळला होता. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तिच्या मेहुण्यावर संशय शिंदखेडा पोलिस (Police) ठाण्यात दिलेल्या जबाबात व्यक्त केला आहे. संशयित मेहुण्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रविवारी रात्री ताब्यात घेतले आहे. (Live marathi News)

शिंदखेडा (Shindkheda) पोलिस ठाण्यात ६ फेब्रुवारीला मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान ११ फेब्रुवारीला विरदेल शिवरातील दादरीच्या शेतात गोणपाटात मुलीचा मृतदेह आढळून आला होता. त्या बालिकेचा तिच्याच ओडणीने (Crime News) गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणी खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा वाढीव कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीचे शवविच्छेदन धुळे येथे जिल्हा रुग्णालयात सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मेहुण्याला घेतले ताब्यात 

दरम्यान मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीमध्ये मुलीच्या मेहुण्यावर संशय व्यक्त केला असून पोलिसांनी मुलीच्या मेहुण्याला (रा. कुरंगी, ता. शहादा) येथून ताब्यात घेतले आहे. त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्याचे समजते. शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये बर्निंग कारचा थरार! डोलवली रेल्वे स्थानकाजवळ कार जळून खाक

दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोणत्याही रेशन दुकानात मिळणार धान्य

CNG कार चालकांचा थरकाप उडवणारी बातमी! धावत्या कारने अचानक घेतला पेट, चालकाचा जागीच कोळसा

Amravati Crime: इंजिनिअर मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, घरातील दृश्य पाहून सर्वजण हादरले

Kidney disease symptoms: किडनी निकामी होण्यापूर्वीच सावध व्हा; 'या' 3 टेस्ट देतील जीवनदान

SCROLL FOR NEXT