Pimpalner News Saam tv
महाराष्ट्र

Pimpalner News : पिंपळनेर बंदला प्रतिसाद; महिलेवरील अत्याचार घटनेच्या निषेधार्ध आदिवासी संघटनेचा मोर्चा

Dhule News : धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आदिवासी महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली

भूषण अहिरे

धुळे : पिंपळनेर येथे महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक झाल्याच्या पाहण्यास मिळाल्या. महिलेवरील अत्याचार घटनेच्या निषेधार्थ संघटनेने आज पिंपळनेर बंदची हाक दिली होती. या बंदला प्रतिसाद मिळला असून आदिवासी संघटनेने मोर्चा काढत घटनेचा निषेध केला.  

धुळ्याच्या (Dhule) साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आदिवासी महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. तीन दिवसांपूर्वी रात्री उशिरा आपल्या मुलासह घरी परतणाऱ्या महिलेवर पिंपळनेर येथे दोघा नराधमांनी आळीपाळीने अत्याचार केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी (Police) दोघांना ताब्यात देखील घेतले आहे. परंतु आदिवासी महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आदिवासी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या असून, आदिवासी संघटनांतर्फे आज पिंपळनेर बंदची हाक देण्यात आली आहे. 

मार्केटमधील सर्व दुकाने बंद  

आदिवासी संघटनेने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत सकाळपासून सर्व दुकाने व आस्थापने बंद ठेवली होती. यामुळे पिंपळनेर शहरात सकाळपासून शुकशुकाट बघावयास मिळाला. त्याचबरोबर सर्व आदिवासी संघटनांनी एकत्रित येत पिंपळनेर शहरातून निषेध मोर्चा काढला. यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे बघावयास मिळाले. आरोपी नराधमांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी; अशी मागणी या मोर्चेकर्‍यांनी केली आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT