Buldhana Water Scarcity : आदिवासी पाड्यांवर भीषण पाणी टंचाई; एका हंड्यासाठी मुलांचीही दोन किलोमीटर पायपीट

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वास्तव्यास असलेल्या भिंगारा, चाळीसटपरी या आदिवासी पाड्यांवर नेहमीचीच पाणी टंचाई आहे.
Buldhana Water Scarcity
Buldhana Water ScarcitySaam tv
Published On

बुलढाणा : यंदा पाणी टंचाईचे सावट सर्वदूर पसरले आहे. प्रामुख्याने डोंगराळ भागातील आदिवासी पाड्यांवर याची दाहकता अधिक पाहण्यास मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील भिंगारा, चाळीसटपरी या आदिवासी पाड्यांवर दरवर्षी हि समस्या पाहण्यास मिळत असून यंदा अधिकच टंचाई आहे. यामुळे हंडाभर पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. 

Buldhana Water Scarcity
Ujani Dam : ४४ वर्षानंतर उजनी धरणाची निच्चांकी पाणी पातळी; पाणी योजना अडचणीत

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वास्तव्यास असलेल्या भिंगारा, चाळीसटपरी या आदिवासी पाड्यांवर नेहमीचीच पाणी टंचाई आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यात देखील इथल्या प्रत्येकाला हंडाभर पाण्यासाठी दोन किलोमिटर अंतरावर पायपीट करत जावे लागते. एवढच काय तर तो हंडा भरण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे भीषण चित्र येथे पाहण्यास मिळत आहे. मात्र भाजपचे आमदार संजय कुटे हे सांगतायेत की मतदार संघात कुठेही पाणी टंचाई (Water Scarcity) नाही. मात्र ही टंचाईची भिषण वास्तविकता दिसून आली आहे.

Buldhana Water Scarcity
Chopda Bribe Case : वाळूसाठी मागितली १० हजाराची लाच; तलाठी एसीबीच्या ताब्यात

लहानग्यांच्या डोक्यावरही हंडा 

भर उन्हातान्हात पाण्यासाठी दोन किलोमीटर अंतर पायपीट करावी लागते. पाणी घेण्यासाठी जाणाऱ्या महिलांसोबत लहान मुलीदेखील जात असतात. डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा घेऊन डोंगराळ भागातून वाट काढत जात असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com