Fake Notes : नाशिकमध्ये पुन्हा सापडल्या बनावट नोटा; मोठे रॅकेट असण्याची शक्यता

Nashik News : नाशिकच्या अंबड पोलिसांनी कालच कारवाई करत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता.
Fake Notes
Fake NotesSaam tv

तबरेज शेख 

नाशिक : नाशिकमधून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा अंबड पोलिसांनी पर्दाफाश केला होता. यानंतर सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमध्ये बनावट नोटा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन महिलांकडून या बनावट नोटा चलनात आणले जात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या नोटा जप्त केल्या आहेत. 

Fake Notes
Chopda Bribe Case : वाळूसाठी मागितली १० हजाराची लाच; तलाठी एसीबीच्या ताब्यात

नाशिकच्या (Nashik) अंबड पोलिसांनी कालच कारवाई करत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. हि टोळी शहरातील एका हॉटेलमध्ये नोटा छापण्याचे काम करत होते. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली असता अंबड हद्दीतुन २३ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. पोलिसांनी या सर्व नोटा जप्त केल्या होत्या. यानंतर आज नाशिकरोड परिसरात ५०० रुपयांचा बनावट नोटा (Fake Notes) चलनात आणताना दोन महिला आढळून आल्या आहेत. 

Fake Notes
Buldhana Water Scarcity : आदिवासी पाड्यांवर भीषण पाणी टंचाई; एका हंड्यासाठी मुलांचीही दोन किलोमीटर पायपीट

नाशिकरोड परिसरात दोन महिला ५०० रुपयांच्या १० हजारांच्या बनावट नोटा चलनात आणत असताना पोलिसांनी (Nashik Police) कारवाई केली आहे. यामुळे नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्यांचा मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाय सलग दोन दिवस कारवाई झाली असताना या टोळीने आणखी किती नोटा चलनात आणल्या असतील हे सांगणे कठीण आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com