Dhule News Snake Bite Saam tv
महाराष्ट्र

Dhule News: सर्पदंशाने जेसीबी चालकाचा मृत्यू; लवकर उपचार झाला नसल्‍याचा आरोप

सर्पदंशाने जेसीबी चालकाचा मृत्यू; लवकर उपचार झाला नसल्‍याचा आरोप

साम टिव्ही ब्युरो

पिंपळनेर (धुळे) : बोडकीखडी (ता. साक्री) येथे सर्पदंशाने जेसीबी चालकाचा मृत्यू झाला. दहिवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात (Sakri) वेळेवर उपचार व रुग्णवाहिका न मिळाल्याने त्याचा मृत्यू (Death) झाल्याचा आरोप करीत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेस पक्ष व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (Breaking Marathi News)

झारखंडमधील रहिवासी असलेला कृष्णा साव हा तरुण १० ते १२ वर्षांपासून साक्री तालुक्यातील बोडकीखडी येथे जेसीबी व्यवसायानिमित्त वास्तव्यास होता. कृष्णा साव यास कानाला सर्पदंश झाल्याने त्यास दहिवेल येथील प्राथमिक (Dhule) आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. बराच वेळ थांबल्यानंतरही उपचार झाला नाही. सर्व कर्मचारी गैरहजर होते. त्यानंतर कृष्णा साव यास साक्री येथे नेण्यात आले.

मात्र, प्रकृती गंभीर असल्याने धुळे येथे नेण्यास सांगितले. तेथे १०८ रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. दहिवेल व साक्री येथे रुग्णवाहिका न मिळाल्याने खासगी वाहनाने धुळे येथे नेत असताना नेर गावादरम्यान कृष्णा साव याचा मृत्यू झाला. धुळे येथे रुग्णालयात त्यास मृत घोषित करून विच्छेदनानंतर मृतदेह मूळ गावी झारखंडकडे रवाना करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला प्रकरणी आज रास्तारोको आंदोलन

Success Story: वडील मजूरी करायचे, लेकाने क्रॅक केली UPSC; पुलवाम्यातील पहिले IAS तौसीफ अहमद गनी यांचा प्रवास

निवडणुकांपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, खासदाराचा तडकाफडकी राजीनामा

Nachni Idli Recipe: नाचणीची मऊसूत इडली कशी बनवायची? या सोप्या स्टेप्स करा फॉलो

Pune Crime: पुणे हादरले! स्नूकर खेळताना खुन्नस दिली, रागाच्या भरात तरुणांनी मित्रालाच संपवलं

SCROLL FOR NEXT