Beed Crime News
Beed Crime NewsSaam tv

Beed Crime News: तक्रार दिल्‍याने तक्रारदार शेतकऱ्यास घरात घुसून मारहाण; ६ जण जखमी

तक्रार दिल्‍याने तक्रारदार शेतकऱ्यास घरात घुसून मारहाण; ६ जण जखमी
Published on

बीड : गावात मोकाट सोडलेल्या डुकरांची तक्रार पोलिसात (Police) आणि तहसीलला का केली? असे म्हणत तक्रारदार (Farmer) शेतकऱ्यांसह इतरांना घरात घुसून अमानुष मारहाण करण्यात आली. यावेळी जमावाने हातात लाठ्या, काठ्या, दावे, पाईपाने ही अमानुष मारहाण केली आहे. यावेळी तक्रारदार (Beed) आपला जीव वाचवण्यासाठी घराचं गेट लावण्याचा प्रयत्न करत असताना मोठ्या दांड्यांनी त्या गेटवर मारत, गेट उघडून तक्रारदारास अमानुष मारहाण करण्यात आली आहे. तर यावेळी घराच्या प्रांगणात एक जणाला खाली पाडून वरून दांड्याने मारहाण करण्यात आली आहे. (Maharashtra News)

Beed Crime News
Parbhani News: महिलांच्‍या लढ्याला अखेर यश; ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर

पाळलेले डुक्करे गावामध्ये मोकाटपणे सोडले जात आहेत. यामुळे या डुकरांनी गावांमध्ये उच्छाद मांडला आहे. यामुळे ग्रामस्थांनी या डुकरांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी घेऊन पोलिस आणि माजलगाव तहसीलला निवेदन देत तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीचा राग मनात घेऊन गावातील या गावगुंडांकडून लाठ्याकाठ्यांनी तक्रारदारांना जबर मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान हे मारहाणीचे चित्र पाहून आपल्या देखील अंगावर शहारे येतील. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Beed Crime News
Aditya Thackeray Banner: आदित्य ठाकरे महाराष्‍ट्राचे भावी मुख्‍यमंत्री; वाढदिवशी लागले संभाजीनगरात बॅनर

सहा गंभीर जखमी

बीडच्या खरात आडगावमधील धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत शेजुळ गोपाळ, आढाव ज्ञानेश्वर, कृष्णा शेजुळ, अनंत आढाव, सुखदेव आढाव, हरिभाऊ शेजुळ यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com