Policemen attacked by a group of locals at a rural hospital in Dhule; incident caught on camera and widely shared on social media. saam tv
महाराष्ट्र

धुळे हादरलं! कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना गावगुंडांची बेदम मारहाण; थरारक व्हिडिओ व्हायरल

Dhule Sakri Jaitane Police Assault Viral Video: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जैताणे येथे कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर गावगुंडांकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Omkar Sonawane

भूषण अहिरे, साम टीव्ही

धुळे: ग्रामीण रुग्णालयात शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनाच बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार साक्री तालुक्यातील जैताने येथे समोर आला आहे. या मारहाणीचा आणि धक्काबुक्कीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून यामध्ये पोलिसांनाच काही जणांकडून धक्काबुक्की आणि मारहाण केली जात असल्याचा प्रकार स्पष्टपणे दिसून येत आहे. यासंदर्भात पोलिसांवर हल्ला करणाऱ्या चौघांविरुद्ध निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्री तालुक्यातील जैताने ग्रामीण रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास काही जण आपापसात वाद घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णालयातील शांतता अबाधित राखण्यासाठी उपस्थितांना वाद न घालता तेथून निघून जाण्याची विनंती केली. यादरम्यान संतप्त झालेल्या संशयितांनी पोलिसांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात करत "तुमची बदली करून देऊ' अशी धमकी देत संशयितांनी पोलिसांवर थेट हल्ला केला.

रुग्णालयातील एक जखमी इसम वाहनात बसवत असताना संशयितांनी त्यावर हल्ला केला. चौघांनी मिळून पोलिस कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी पोलिसांना मारहाण प्रकरणी चारही संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर 1 आरोपी सध्या फरार असून त्याचा देखील शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT