Kunal Patil Saam tv
महाराष्ट्र

Kunal Patil : धुळ्यात राजकीय भूकंप; कुणाल पाटलांचा काँग्रेसला रामराम, भाजप प्रवेशासाठी हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Dhule news : धुळे जिल्ह्यातून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कुणाल पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुकटी गाव परिसरासह धुळे तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना झाले

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात मोठा राजकीय भूकंप पाहण्यास मिळत आहे. काँग्रेसचे कट्टर समर्थक असलेले काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाले असून उद्या मुंबई येथे ते अधिकृत प्रवेश करणार आहे. यासाठी आज हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. 

धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचा चेहरा असलेले तसेच राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले माजी आमदार कुणाल पाटील यांचा १ जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कुणाल पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी मुकटी गाव परिसरासह धुळे तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.  

माजी जि.प. सदस्यांसह बाजार समिती संचालकांचा समावेश  

तसेच कुणाल पाटील यांच्या प्रवेशासाठी आज गेले त्यापेक्षा अधिक पटीने कार्यकर्ते उद्या सकाळी मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या कार्यकर्त्यांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती संचालक तसेच अनेक विद्यमान सरपंच आणि उपसरपंच यांचा समावेश आहे. मुकटी परिसर आणि धुळे तालुक्यातील विविध भागांमधून हे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईकडे निघाले आहेत. 

धुळ्यात काँग्रेसला धक्का 
कुणाल पाटील यांच्या नेतृत्वात होणारा हा पक्षप्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपला यामुळे धुळे जिल्ह्यात नवसंजीवनी मिळेल, तर काँग्रेस पक्ष जिल्ह्यातून जवळपास संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. या मोठ्या पक्ष प्रवेशामुळे धुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Disha Salian Case: संजय राऊतांचा नितेश राणेंवर हल्लाबोल; पिक्चर अभी बाकी, नितेश राणेंचं प्रत्युत्तर

Ladki Bahin Yojana : सरकारी लाडकींना अखेर दणका, 2,289 जणांचा लाभ बंद; आता निलंबन कधी? VIDEO

SCROLL FOR NEXT